होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Rain : अवकाळी पावसाने उडाली जळगावकरांची तारांबळ, शेतकरी वर्ग चिंतेत!

On: January 27, 2026 12:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Rain : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मंगळवारी (दि. २७ जानेवारी) दुपारी जळगावसह काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे जळगावकरांची तारांबळ उडाली. दुसरीकडे केळी पिकांसह रब्बी हंगामातील गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

उत्तर भारतातील सक्रिय पश्चिमी चक्रवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी वाढणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत आणखी ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बसण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, २९ आणि ३० जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटे दाट धुक्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी राहील. मात्र दुपारनंतर सूर्यप्रकाश तीव्र राहणार असून, तापमान ३० अंशापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे पहाटे धुके आणि दिवसा उन्हाचा चटका असे समित्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment