होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कुऱ्हाड तांडा हल्ला प्रकरण: हल्लखोरांवर कारवाई करा, पीडित कुटुंबाने दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा!

On: June 14, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या अवैध व्यावसायांनी उच्छाद मांडला होता. याच पार्श्वभूमीवर कुऱ्हाड तांडा येथे २४ एप्रिल रोजी अवैध व्यवसायांच्या तक्रारीच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो तरुण जबर जखमी झाल्याने त्याच्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो तरुण जीवनाशी झुंज देत आहे. याप्रकरणी संशयित आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी आज पत्रकार परिषद घेऊन जखमीच्या कुटुंबाने केली आहे. अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

या हल्ला प्रकरणात सहभागी संशयितांना अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपी हा घटना घडल्या पासून फरार होता. असे असतांना या खुनी प्रकरणातील जीवावर बेतलेल्या आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला तरुण उपचार घेत असताना त्याच्या मारेकऱ्याला जामीन मंजूर झाल्याचा दावा कुटुंबाने केला. त्यामुळे वैफल्यग्रस्त कुटुंबामध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत पीडित कुटुंबाने जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या १९ तारखेला सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली आहे.

कुऱ्हाड तांडा येथे तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्यात त्याच्या पोटाच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. तरुण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती आजही चिंताजनक आहे. त्याच्यावर २४ एप्रिल पासून उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपासादरम्यान काही आरोपींना अटक करण्यात आली, तर अल्पवयीन बालक आरोपींना बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. मात्र मुख्य आरोपी हा हल्ला केल्यापासून फरार झाला होता.

तर आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची चर्चा असतांनाच त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या बाबत न्यायालयीन आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने पोलिस प्रशासनाकडून जामीनाला दुजोरा देण्यात आलेला नाही. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपी फरार असताना देखील त्यांच्यावर दबाव आणि धमक्या देण्याचे प्रकार सुरू असून आता तर आमच्या जिवाला धोका धोका निर्माण झाला आहे. जखमी तरुणाची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने त्याच्यावर आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

जळगाव येथे पत्रकार परिषद घेत पीडित कुटुंबातील सदस्यांनी आपली व्यथा मांडली असून गेल्या दीड ते दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर दुसरीकडे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्याची शंका उपस्थित केली आहे. आम्हाला न्याय पाहिजे मुख्य आरोपीचा जमीन रद्द करण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय् मिळवून द्यावा अन्यथा १९ जून रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात अजूनही तपास सुरू असल्याचे समजते तर या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय पावले उचलतात हे आता बघावे लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिल्ह्यातील एक सत्र शाळांच्या वेळेत बदल करा: समन्वय समितीची मागणी

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाचा मुख्य सचिवांकडून आढावा

अवैध वाळू वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांची धडक कारवाई; ४६ लाखाचा मुद्देमाल ताब्यात, वाळूने भरलेले दोन डंपर जप्त

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, पोलिसांनी सुमारे ८ लाखांचा दंड केला वसूल!

गोदावरीच्या किनारी आढळली एक काळ्या रंगाची सुटकेस, चैन उघडल्यावर पोलीसांना ही बसला धक्का!

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श; स्वतःच्या मुलांचा शासकीय शाळेत केला प्रवेश

Leave a Comment