Uddhav Thackeray Shivsena Meeting: शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईतील निवासस्थानी पक्षाच्या सर्व लोकसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरू असताना, या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या बैठकीला कोण उपस्थित होते कोण नाही याची चर्चा होती, या बैठकीला प्रत्यक्षात चार खासदार उपस्थित होते तर इतर पाच खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली अशी, माहिती खा. संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी यापूर्वी अनेकदा ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करून ‘उबाठा’चे खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या मोठ्या दाव्यामुळे ‘उबाठा’ गटात अस्वस्थता पसरली आहे. “ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण होईल,” अशी माहिती जाधव यांनी परभणी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

संजय राऊत यांनी दिली बैठकीनंतर माहिती
संजय राऊतांनी (Sanjay Raut) सोशल पोस्ट करत मातोश्री झालेल्या बैठकीबाबत माहिती देतांना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली, बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे उपस्थित होते. शिवाय ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार आदिंनी ऑनलाईन हजेरी लावली आहे. तर संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत, बैठकीत युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा व्यक्त केली. मात्र पुढील महिन्यात पुन्हा शिवसेनेचीए शिवसेनेची बैठक होणार असल्याचे समजते.










