होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विदर्भात उष्णतेची लाट, तीन दिवस ‘या’ ठिकाणांना दिला ‘येलो अलर्ट’

On: June 16, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये दि १६ व १७ असे जून रोजी दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वाहण्याची दाट शक्यता आहे. कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे.तसेच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची दाट शक्यता असून कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी रात्री गरम वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, १६ ते १९ जुन दरम्यान हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण आणि गोव्यात १६ जून रोजी काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता असून १७ जूनला विदर्भात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. १८ जूनला मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता. कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता. १९ जूनला विदर्भात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता असून कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रात दि. १८ जूनला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ४०-५० किमी प्रति तास वेगाने वाहण्याची दाट शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी रात्री उबदार राहण्याची शक्यता आहे. दि. १९ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ४०-५० किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment