होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खडकवासला ‘एनडीए’चे माजी विद्यार्थी बनणार ‘लष्कर प्रमुख’; ले.जनरल धीरज सेठ ३० जूनला कार्यभार स्वीकारणार

On: June 14, 2026 12:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Delhi News: सध्या उपलष्कर प्रमुख कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (Dhiraj Seth) पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम यांची केंद्र सरकारने ३० जून २०२६ च्या दुपारपासून पुढील लष्कर प्रमुख (Army Chief) म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र व्दिवेदी (Upendra Diwedi) पीव्हीएसएम , एव्हीएसएम ३० जून रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.

खडकवासला ‘एनडीए’चे माजी विदयार्थी

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे खडकवासला येथील (NDA) राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1986 मध्ये ते ‘आर्मर्ड कॉर्प्स’मध्ये रुजू झाले. जवळपास चार दशकांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीत त्यांना परिचालन ,धोरणात्मक, क्षमता विकास आणि संस्थात्मक अशा विविध क्षेत्रांचा व्यापक अनुभव आहे. भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता आणि दीर्घकालीन परिवर्तनामध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

प्रत्येक स्तरावर नेतृत्व

या जनरल ऑफिसरनी विविध प्रकारच्या वातावरणात प्रत्येक स्तरावर नेतृत्व केले आहे. त्यांच्या कमांडच्या नियुक्त्यांमध्ये वाळवंटी प्रदेशात एक आर्मर्ड रेजिमेंटचे, वेस्टर्न थिएटरमधील एका आर्मर्ड ब्रिगेडचे ( Armed Briged) आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये एका दहशतवाद विरोधी दलाचे नेतृत्व केले आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी भारतीय लष्कराच्या प्रमुख स्ट्राइक फॉर्मेशन्सपैकी एक असलेल्या सुदर्शन चक्र कॉर्प्सचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम पाहिले, जिथे त्यांनी प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लष्करी मोहिमा आणि औपचारिक जबाबदाऱ्यांवर देखरेख केली.

साऊथ वेस्टर्न आणि सदर्न कमांडचे नेतृत्व

आर्मी कमांडर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, त्यांनी (South Western Command) साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचे नेतृत्व केले, आणि अडीच वर्षांहून अधिक काळ दोन ऑपरेशनल आर्मी कमांड्सचे नेतृत्व करण्याचा आणि महत्त्वाच्या भूप्रदेशात व्यूहात्मक देखरेख ठेवण्याचा दुर्मिळ मान मिळवला. त्यांनी अनेक महत्त्वाच्या स्टाफ आणि धोरणात्मक पदांवर काम केले आहे, ज्यांचा परिचालन नियोजन, सैन्य व्यवस्थापन आणि क्षमता विकासावर लक्षणीय प्रभाव पडला आहे.

लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

सैन्यदलाच्या आधुनिकीकरणातील योगदानासाठी प्रामुख्याने ओळखल्या जाणाऱ्या या जनरल ऑफिसरने लष्कर मुख्यालयाच्या धोरणात्मक नियोजन आणि क्षमता विकास या विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना लष्कराच्या आधुनिकीकरणाची दिशा, क्षमता आराखडा आणि दीर्घकालीन सैन्य रचना उपक्रमांना आकार दिला आहे. परिचालन गरजांना उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्धभूमीच्या गरजांशी जोडण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

लष्करी शिक्षणात उत्कुष्ट कामगिरी

कुशल लष्करी व्यावसायिक असलेले लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी व्यावसायिक लष्करी शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून, विविध अभ्यासक्रमांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. ते हायर कमांड कोर्स आणि (National Defence College) नॅशनल डिफेन्स कॉलेजचे पदवीधर असून, त्यांनी पॅरिसमधील प्रतिष्ठित कमांड अँड स्टाफ कोर्समध्येही शिक्षण घेतले आहे, जे त्यांचा व्यापक धोरणात्मक दृष्टिकोन आणि समकालीन लष्करी घडामोडींची समज दर्शवते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment