Rahul Gandhi : लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भातील मुद्दा मांडत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की ”चिनी घुसखोरी देशातील प्रत्येक जवानाला माहिती आहे, मात्र तुम्ही ते लपवून ठेवलं”. राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकासह एका मासिकातील लेख उद्धृत करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यास विरोध दर्शवला.
राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात चीनचा उल्लेख नाही, तरी राष्ट्रीय सुरक्षेबाबत बोलण्याचा अधिकार आम्हाला नाकारला जातो का? त्यांनी डोकलाममधील घटना आणि भारत-चीन संबंध मुद्दा मांडला. यावेळी सभागृहात गोंधळ उडाला. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी सभागृहाची दिशाभूल करत असल्याचे सांगितले.
तर बोलण्यास अधिकार – सभापती ओम बिर्ला
राहुल गांधी यांनी मासिकातील लेख उद्धृत करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यावर ट्रेझरी बेंचने विरोध दर्शवला. अखिलेश यादव यांनी चीनसंदर्भातील मुद्दा संवेदनशील असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेत्यांना राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर बोलण्याची परवानगी असावी, असे मत व्यक्त केले. दरम्यान, सभापती ओम बिर्ला यांनी नियम, प्रक्रिया आणि परंपरेनुसार बोलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.









