होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Health Tips: तुम्हाला म्हातारपणापर्यंत निरोगी राहायचेय का? मग, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स  

On: February 7, 2026 4:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Health Tips: हल्लीचं युग हे धावपळीचं आहे. या युगातील आधुनिक जीवनशैलीमुळे प्रत्येकाला आरोग्याच्या काही न काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनियमित दिनचर्या, असंतुलित आहार यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशात तुम्हाला म्हातारपणापर्यंत निरोगी राहायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. या लेखात निरोगी जीवनशैलीसाठी काय केले पाहीजे, या विषयी आपण जाणून घेणार आहोत. या लेखालत काही महत्त्वाच्या हेल्थ टिप्स दिल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही निरोगी आयुष्य जगण्यास सुरुवात करू शकता.

निरोगी आयुष्यासाठी फॉलो करा या टिप्स

 

पोटाचे आरोग्य जपा

व्यक्तीला जडणारे जवळपास 90 टक्के आजार हे पोटाच्या समस्येतून निर्माण होतात. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा. कारण, चुकीच्या आहारामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोट साफ राहील याची काळजी घेतली पाहीजे. तसेच भाताचे सेवन केल्यानंतर दुध पिऊ नये, यामुळे पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.

 

गरम पाण्याने आंघोळ टाळा

आंघोळ करणे हे दिनचर्येतील महत्त्वाचे काम आहे. पण, आंघोळ करताना केलेली चूक आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आंघोळ करताना गरम पाणी टाळा. कारण, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरिराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आंघोळ करताना डोक्यावरुन गरम पाणी घेऊ नये. यामुळे डोळे कमजोर होतात.

 

गव्हाच्या पिठाबाबत घ्या ‘ही’ काळजी

अनेकांच्या रोजच्या आहारात गव्हाच्या पोळ्यांचा समावेश असतो. परंतु गव्हाच्या पिठाबाबत विशेष काळजी घेतली पाहीजे. 15 दिवसांपेक्षा जास्त जुने पीठ वापरु नये.

 

चहा पिणे टाळा

बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. काही जण दिवसभरात अनेक कप चहा पितात. मात्र, असे करणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. चहामुळे जवळपास 80 प्रकारचे आजार होतात. त्यामुळे चहा पिणे टाळावे. यासह साखरेपासून बणविलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्टचे कामीत कमी सेवन करा.

 

ॲल्युमिनियमच्या भांड्याच अन्न शिजवू नये

स्वयंपाक घरात अन्न शिजवण्यासाठी अनेक धातुंच्या भांड्यांचा वापर केला जातो. यात बहुतांश वेळा ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा देखील वापर केला जातो. मात्र, ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजविणे किंवा खाने आजाराला निमंत्रण ठरते. जवळपास 48 प्रकारे रोग नुसत्या ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यामुळे ॲल्युमिनियमच्या ऐवजी मातीच्या भांड्यात, काशाच्या भांड्यात किंवा पितळाच्या भांड्यात स्वयंपाक करावा. तसेच स्वयंपाक झाल्यानंतर तो 48 मिनिटांच्या आत खावा. उशीर केल्याने त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

 

मद्य, कोल्ड्रिंकचे अतिसेवन

हल्ली जंक फुडच्या या युगात मद्य सेवन आणि कोल्ड्रिंकचे सेवन अनेक जण करातात. कोल्ड्रिंक तर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण पितात. मात्र, मद्य आणि कोल्डिंकचे आतिसेवन आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे हृदय रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पदार्थांचे अतिसेवन टाळावे.

 

ज्वारीचे सेवन आरोग्यवर्धक

आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे सेवन फायदेशीर ठरते. ज्वारी ही पचनास हलकी असल्याने पचनक्रीया देखील सुरळीत राहते. यासह ज्वारीचे नियमित सेवन केल्याने अकाली वृद्धत्व लवकर येत नाही.

 

व्यसन टाळा

निरोगी आयुष्यासाठी व्यसन टाळले पाहीजे. व्यसनामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. गुटका, डुक्कराचे मांस, पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगारेट, कोल्ड्रिंक यामुळे पोटातील मोठे आतडे सडतात. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात.

 

जेवणानंतर टाळा ‘ही’ चूक

काही लोक आंघोळीच्या आधी जेवन करतात आणि जेवण झाल्यानंतर लगेच आंघोळ करतात. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरते. जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनशक्ति कमजोर होऊन शरीर कमजोर होते.

 

आंघोळ करताना घ्या ‘ही’ काळजी

आंघोळ करताना कधीही झटकन डोक्यावर पाणी घेऊ नका. कारण, असे केल्याने आर्धांगवायु किंवा हृदयविकाराचा झटका येवू शकतो. त्यामुळे आंघोळ करताना सर्वात आधी पायावर त्यानंतर गुढग्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर आणि नंतर डोक्यावर पाणी टाकून आंघोळ करावी.

 

हेअर कलर करु नका

तरुण दिसण्यासाठी अनेक जण हेअर कलर करतात. हेअर कलर केल्याने डोळ्यांवर दुष्परिणाम होत दृष्टी कमी होते.

 

रात्री संतुलित आणि मोजका आहार घ्या

प्रत्येकाने जेवणाच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यानुसार, दुपारचे जेवण वेळेवर आणि पोटभरुन केले पाहीजे. तर रात्री हलका आणि मोजका आहार घ्यावा.

 

पाणी आणि मिठाबाबत पाळा नियम

अनेक जण उभे राहूण पाणी पितात. उभे राहून पाणी पिल्याने टाच दुखण्याची समस्या निर्माण होते. तसेच नेहमी ताजे पाणी प्यावे. पिण्यासाठी विहीरिचे पाणी फार उत्तम. बाटलीबंद किंवा फ्रिजचे पाणी टाळावे. तसेच दुषित पाण्यामुळे यकृत, टायफाईड, पोटाचे विकार होतात. ही समस्या टाळण्यासाठी पाण्यात निंबूचे सेवन करणे लाभदायक ठरते. यासह जेवतान कधीही वरुन मीठ घेऊ नये. जेवनात वरुन मीठ घेतल्याने रक्तचाप आणि ब्लडप्रेशर वाढतो. तसेच शक्य असल्यास आहार सैंधव किंवा काळ्या मिठाचा वापर करावा.

 

लसणाचे सेवन

जेवणात लसूण हे आन्नाची चव तर वाढवतोच पण, आरोग्यासाठी देखील लसूण खूप लाभदायक ठरतो. लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 

शिंकताना घ्या ‘ही’ काळजी

शिंक येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिंक प्रत्येकाला येते. शिंकताना मोठ्याने शिंकू नये. मोठ्याने शिंकल्यास कानाला त्रास होऊ शकतो.

 

तुळशीची पाने आणि गुळ

दररोज सकाळी तुळशीची 2 पाने खाणे आरोग्याला फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी, ताप, मलेरियाचा त्रास होत नाही. जर तुम्हाला सतत कफचा त्रास होत असेल तर नेहमी छातीवर मुलहठी चोळावी. यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते. यासह रोज जेवणानंतर बडीशेफ आणि जुना गुळाचे सेवना करावे. असे केल्याने प्रचनक्रीया सुरळीत राहते.

 

पोटाची वाढलेली चरबी अशी करा कमी

अनेकांना पोटाची चरबी वाढल्याची समस्या निर्माण होते. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी दररोज एक वाटी दहीचे सेवन करावे.

 

प्रथिनांसाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

मुगात मटनापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे आहारात मुगाची उसळ, आमटी, हिरव्या मुगाची भाजी असे पदार्थांचा समावेश करावा. तसेच गव्हाचा कोंब किंवा गव्हाचा चीकाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

 

मांसाहाराचे अतिसेवन टाळा

अनेक जण जिभेचे चोसले पुर्ण करण्यासाठी सतत मांसाहार करतात. मांसाहाराचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जवळपास 160 प्रकारचे आजार हे केवळ मांसाहार केल्याने होतात. त्यामुळे मांसाहाराचे अतिसेवन टाळावे.

 

लहान मुलांच्या आहारात टाळा ‘हे’ पदार्थ

लहान मुलांच्या आहाराबाबात विशेष काळजी घेतली पाहीजे. त्यानुसार, 14 वर्षाखालील लहान मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, समोसा आणि मैद्याचे इतर पदार्थ खाण्यास देवू नये.

 

त्वचेच्या समस्येवर करा हा उपाय

जर अनावधानाने चटका लागला असेल तर भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी या पैकी काही एक लावल्याने थंड वाटते आणि व्रण देखील पडत नाही. तसेच डोळ्याची जळजळ, खाज, लाली दुर करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने आराम मिळतो.

 

असे राखा दातांचे आरोग्य

पांढरे शुभ्र आणि निरोगी दातांसाठी निंबू, मोहरीचे तेल, हळद आणि मीठ एकत्र करुन दात घसावे. असे केल्याने दातांशी संबंधित अनेक आजार दुर होतात. मात्र, तुम्हाला डोळ्यांचा त्रास असेल तर हा उपाय करणे टाळावे.

 

सततचे जागरण टाळावे

हल्ली अनेक जण उशीरापर्यंत जागी राहतात. मोबाईलचा अतिवापर याचं एक मोठ कारण म्हणता येईल. मात्र, उशीरा झोपणे किंवा सतत जागरण करणे आरोग्यासाठी खूप घातक ठरतं. जागरणाने शरिराची रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते. तसेच डोळ्यांच्या आजाराचा धोका देखील यामुळे वाढतो.

वरील दिलेल्या टिप्स ह्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि लाभदायक आहे. या टिप्स फोलो करुन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी डिजिटल शौर्य मराठीच्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपाची ‘फायर ऑडीट’ कार्यवाही; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

ICU जळीत प्रकरण: जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची नव्याने करणार उभारणी: चंद्रशेखर बावनकुळे

सर्दी-खोकला अन् घशात खवखव होतेय का; मग घरगुती काढा देईल आराम! घरातील मसाल्यापासून कसा बनवाल काढा ‘ते’ जाणून घ्या

महाआरोग्य शिबिर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजार कितीही गंभीर असो, पैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही”

Monsoon Care:  पावसाळ्यात फॉलो करा ‘या’ 10 टिप्स, डेंग्यू- मलेरियासारख्या आजारांपासून राहाल सुरक्षित

Health News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून महाआरोग्य शिबिर

Leave a Comment