होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

फेब्रुवारीतच एप्रिलचा कडाका; जळगावात तापमान ३३ अंशांपार

On: February 13, 2026 1:30 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : फेब्रुवारी महिना अर्ध्यावर येण्यापूर्वीच जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असून, रात्रीचा गारठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी जळगावचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३३.४ अंशांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच कालावधीत कमाल तापमान सुमारे ३२ अंशांच्या आसपास होते. मात्र यंदा तापमानाने ३३ अंशांचा टप्पा ओलांडल्याने दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे.

सामान्यतः मार्चच्या उत्तरार्धात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जाणवू लागली आहे. सकाळी आणि रात्री हलकी थंडी असली तरी दुपारच्या सत्रात सूर्याचा कडाका वाढत आहे. गेल्या सहा दिवसांतील नोंदींनुसार कमाल तापमान सातत्याने ३३ अंशांच्या पुढे राहिले आहे.

दुपारच्या उन्हात बाहेर पडा, पण…

दरम्यान, हवेत आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरडेपणा वाढला असून उष्णतेची तीव्रता अधिक भासत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment