होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: अवजड वाहने बायपासमार्गे वळवा!, बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

On: February 14, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहरातून जाणार्‍या महामार्गाचे खोटेनगर ते गिरणा नदी पुलादरम्यान काम सुरु असून यामुळे वाहतुक कोंडी होवून या कोंडीत रुग्णवाहीका अडकण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच 10 वी, 12 वीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांची देखील मोठी दमछाक होत आहे, त्यामुळे या मार्गावरुन होणारी अवजड वाहतुक तरसोद बायपासमार्गे वळवी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

निवेदनात, शहरातून जाणार्‍या महामार्गाचे खोटेनगर ते गिरणा नदी पुलादरम्यान काम सुरु आहे. एकाच बाजुचे काम प्रगतीपथावर असून दुसर्‍या बाजूकडून जळगाव ते धुळे व धुळे ते जळगाव या मार्गावरील वाहतुक एकाच बाजूने सुरु आहे. यात अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यातच रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

अशात 10 वी व 12 वीच्या परीक्षा सुरु असल्याने या परिसरातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांची व पालकांची दमछाक होत आहे. शाळेत, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे, सुमित्र अहिरे, देवानंद निकम, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, दिलीप जाधव, डी.एम. भालेराव, रमेश थाटे, लंकापती भालेराव, रविंद्र मोरे, पी.डी. सोनवणे, प्रभाकर मोरे, रविंद्र बाविस्कर, योगेश सोनवणे, गौरव सुरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

दोन्ही बाजूंनी येणार्‍या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होवून अनेक लहान वाहने रस्त्याच्या कडेला उलटली आहेत. तसेच लहानमोठ्या अपघात़ांचे प्रमाण वाढलेले आहे. अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी जळगावकडे तसेच जळगावकडून पुणे-मुंबईकडे नेत असलेल्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्ण देखील दगावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, जिवितहानीची व अपघाताची शक्यता टाळण्यासाठी व रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी अवजड व इतर मोठी वाहने तरसोद बायपासमार्गे वळविण्यात यावी, पाळधी व तरसोद जवळ बॅरिकेटस लावून वाहतूक बायपासमार्गे करण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. हा पर्यायी मार्ग शासन व प्रशासनाने खुला न केल्यास बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment