Jalgaon News: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे संकटमोचक आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी गणिते पक्की करण्यात व्यस्त आहेत. महायुतीसमोर बंडखोरीच्या मोठे आव्हान आहे, आता नाशिक आणि जळगाव हे दोन मतदारसंघ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेचे केले आहे. नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटांचे मंत्री उद्य सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोकुळ गीते यांची समजूत काढण्यात यश आले आहे. त्यांनी या निवडणुकीत माघार घेतली असली तरी स्पस्पष्टपणे पाठींबा देण्याबाबत नकार दिल्याने खऱ्या अर्थाने दराडे आणि गीते यांचे मने जुळली की नाही? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
वरिष्ठांचा मोठा दबाव असतांना ही गीते आणि दराडे यांची मने जुळू शकली नाहीत, वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली माघार घेतल्याचे एकूणच त्यांच्या बॉडी लॅंग्वेज वरून दिसून येत होते. गीते यांना स्वपक्षासह शिंदे गटातील काही मतदारांचा पाठींबा असल्याची चर्चा होती, त्यामुळेच गोकुळ गीते हे रिंगणातून माघार घेण्यास इच्छुक नसल्याने काळजावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपाची चिंता ही वाढतांना दिसून येत आहे,

दरम्यान मुलाला तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निवडणुकीपासून अंतर राखल्याने भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागत आहे. गोकुळ गीतेची नाशिक येथील पत्रकार परिषदेतील एकंदरीत देहबोली बघितली असता, शिंदे गट अधिक सावधगिरी बाळगत आहे. तर दुसरीकडे रेशमा काळे यांनी आपला प्रचार सुरूच ठेवल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिंदे गट आणि भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनी आपली उमेदवारी काय म ठेवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गोकुळ गीते यांच्या सारखेच काळे ही अडून बसल्याने या निवडणुकीत युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय की काय असे, चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जात असल्याने ते सातत्याने काळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. ही माघार देखील यशस्वी होईल, अशी भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. एक मात्र निश्चित जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निवडणुकीपासून अंतर ठेवल्याने गुंता अधिकच वाढल्याचे दिसले.






