होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विधान परिषद निवडणूक: अपक्ष चौधरींमुळे महाजन आणि तायडे यांना आव्हान? जळगावमध्ये तिरंगी सामना

On: June 13, 2026 6:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघा घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर निवडणुकीत चुरस वाढली आहे, रेशमा काळे यांची माघार झाल्याने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Mahayuti) महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन (Nanadkishor Mahajan)आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शरद तायडे Sharad Tayde) यांच्यात दुरंगी सामना होण्याची शक्यता होती. मात्र प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी हे अपक्ष म्हणून रणांगणात उतरल्याने या निवडणुकीत आता आणखी रंगत आली आहे. त्यामुळे हा सामना आता तिरंगी होण्याचे सध्या तरी चित्र दिसून ये आहे.

प्रस्थापित पक्षांना आव्हान?

दरम्यान भाजपाकडे बहुमत असल्याचा दावा केला जात आहे, त्याच्याकडे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन असल्याने महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भाजपा नेत्यांना आहे, रेशमा काळे यांनी माघार घेतल्याने नंदकुमार महाजन यांच्यासमोरील अडथळा दूर झाला असून गिरीश महाजन यांनीआपले रणनिती आखली आहे. असे असले तरी अनिल चौधरी यांचा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी असलेला दांडगा संपर्क आणि वैयक्तिक हितसंबंधांमुळे ते महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठे आव्हान देऊ शकतात. महायुतीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न अपक्ष आणि उबाठा गटाचे उमेदवार करू शकतात त्यामुळे भाजप- शिवसेना महायुतीला आपले हक्काचे मतदान राखण्याचे आव्हान ही राहणार आहे.

दरम्यान या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील याची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे, मुलाला तिकीट नाकारल्याने नाराज असल्याची चर्चा होती मात्र गिरीश महाजन यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी युतीत ऑल इज वेल असल्याचे दाखवले, मात्र खऱ्या अर्थाने घोडा मैदान जवळ आहे. त्यावेळी सर्व चित्र स्पष्ट होईल. परंतु सध्या शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतली असली तरी प्रहारचे अनिल चौधरी यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने माघारी हटण्यास नकार दिला
आहे. त्याने या निवडणुकीत चुरस निर्माण केले आहे, त्यामुळे आता संपूर्ण जिल्हयाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

रेश्मा काळे यांचा महायुतीला पाठिंबा

काळे यांच्या माघारीने महायुतीची डोकेदुःखी कमी झाली आहे.शिवसेना (शिंदे गट) बंडखोर उमेदवार रेश्मा काळे याने महाजन यांना पाठींबा दिला आहे. काळे यांनी बोलताना आपण प्रचार थांबवत असून महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून माघारीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment