Latest Weather News: Latest Weather News: राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे.सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे २७.४ अंश सेल्सियस तापमान होते. विदर्भातील काही भाग वगळला तर राज्याचे तापमान खाली आले आहे. मात्र वातावरण दमट आणि आद्रता वाढल्याचे दिसून येत आहे. अल निनोचा प्रभाव आता जाणवत असून मान्सून लांबल्याने उष्णता आणखी असह्य होत आहे. जळगावचे तापमान आज ४०.२ अंश सेल्सियस इतके होते, जळगावचा पारा सातत्याने ४० अंशाच्या वर दिसत असून उकाडा कमी होण्याचे नाव घेईना. सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या मात्र मान्सूनचे आगमन इतक्यात होण्याची शक्यता कमी आहे. तुरळक पाऊस वगळता दिर्घ काळ नागरिकांना दिलासा मिळणे शक्य नाही. त्यातच जून महिना आता संपल्यात जमा आहे. मान्सून नेमका कधी सुरू होईल, हे सांगणे ही आता कठीण झाले आहे.
..या ठिकाणी येलो अलर्ट
दरम्यान कोकण आणि विदर्भात दि १८ ते २२ जून दरम्यान येलो अलर्ट दिला आहे, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात १८ ते २० जून दरम्यान तर येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा:
* दि. १८-१९ जून:- कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची (४० – ५० किमी प्रति तास) दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट असून कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता आहे.
*दि. २० जून:- विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची (४० – ५० किमी प्रति तास) दाट शक्यता असून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
*दि. २१ जून:- विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची (ताशी ४०-५० किमी) शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता आहे.
*दि. २२ जून:- कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची (ताशी ४०-५० किमी) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३५.८,
सांताक्रूझ ३४.८,
अलिबाग ३७.६,
रत्नागिरी ३४.७,
पणजी (गोवा) ३४.४
डहाणू ३६.६,
पुणे ३६.६,
लोहगाव ३६.८,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४०.२,
कोल्हापूर ३४.७,
महाबळेश्वर २७.४,
मालेगाव ४१.०,
नाशिक ३५.६,
सांगली ३५.९,
सातारा ३६.४,
सोलापूर ३९.३,
धाराशिव ३७.७,
छत्रपती संभाजीनगर ३८.९,
परभणी ३९.२,
नांदेड ४०.०,
बीड ३९.९,
अकोला ४१.०,
अमरावती ३८.८,
बुलढाणा ३८.५,
ब्रह्मपुरी ४२.८,
चंद्रपूर ४१.२,
गोंदिया ४१.२,
नागपूर ४०.०,
वाशीम ३८.६,
वर्धा ४०.५,
यवतमाळ ३९.८.











