Neet Exam News: देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणानंतर ही नीट घेणाऱ्या संस्थांच्या वादग्रस्त कारभार अद्याप ही सर्च आहे. आधीच नीट फुटी प्रकरणाने विदयार्थी पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, काही विदयार्थ्यांनी तर आत्महत्या ही केल्या आहेत. त्यातच आता नागपूरमधून आणखी एक भोंगळ कारभाराचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. नीट पेपर फुटीनंतर नीटची फेरपरीक्षा उद्या (२१ जुन २०२६) रोजी होईल. असे असताना नीटची मूळ परीक्षा ज्या विद्यार्थ्याने नागपुरात दिली, त्याला चक्क अबुधाबीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. याबाबत एका वृत्तवाहिने हा विषय लावून धरल्या नंतर एनटीएला जाग आली असून अब्दुल्लाला नावाच्या परीक्षार्थीला आता नागपूरचेच परीक्षा केंद्र दिले जाणार आहे.
नीटची मूळ परीक्षा ज्या विद्यार्थ्याने नागपुरात दिली, त्याला चक्क अबुधाबीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. नीटची मूळ परीक्षा ज्या विद्यार्थ्याने नागपुरात दिली, त्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र कसं काय देऊ शकता? असा प्रश्न अब्दुल्लाचे वडील डॉ. मोहम्मद तालीब यांनी विचारला होता. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृत्तानंतर या प्रकरणावर आता एनटीएने खुलासा करत अब्दुल्लाला नागपुरचेच परीक्षा केंद्र देण्यात संकेत दिले आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर तालीब म्हणाले, की त्यांनी शनिवारी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर अबुधाबीचे परीक्षा केंद्र दिसून आले. हे पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनवर संपर्क केला. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी मेलही केले. एनटीएचे अधिकाऱ्यांनी आज दुपारी चार वाजेपर्यंत परीक्षा केंद्र बदलून नागपूर देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता एनटीएने आपला आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा अब्दुल्लाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
एनटीएने परीक्षा केंद्र बदलून दिले नाही तर
धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल्लाकडे सध्या पासपोर्ट नाही. त्यामुळे जर एनटीएने त्याला परीक्षा केंद्र बदलून दिले नाही, तर त्याला परीक्षेला मुकावं लागेल आणि त्याचा एक वर्ष वाया जाईल. हि भीती देखील अब्दुल्लाचे वडील डॉ. मोहम्मद तालीब यांनी बोलताना व्यक्त केली आहे.










