होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सिंहस्थ कुंभमेळा २०२७: ग्रामीण पर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापनावर झेडपीचा भर

On: June 20, 2026 11:54 AM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: आगामी नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांनी आज जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. कुंभमेळ्यादरम्यान ग्रामीण भागातील पर्यटनवृद्धी, भाविकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने करावयाच्या तयारीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

युवकांनी सहभाग वाढवावा

बैठकीत पवार यांनी कुंभमेळ्याच्या काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeswar) परिसरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक भेट देण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. त्यामुळे ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी प्रत्येक पंचायत समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटन केंद्रे आणि भाविकांच्या संभाव्य हालचालींचे नियोजन करावे, असे सांगितले. ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी यासाठी स्थानिक स्वयं-सहाय्यता गट, ग्रामपंचायती आणि युवक मंडळांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Mangemant) संदर्भात पवार यांनी अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळणे, गर्दी व्यवस्थापन तसेच आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत ठेवणे, संवेदनशील ठिकाणांची माहिती संकलित करणे, आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय राखणे आणि ग्रामस्तरावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

धार्मिक सोहळा आणि पर्यटन विकास

तसेच कुंभमेळ्याच्या (Kumbha Mela)कालावधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल, आरोग्य, पोलीस व इतर विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून जिल्ह्याच्या पर्यटन, विकास आणि व्यवस्थापन क्षमतेचे प्रदर्शन करण्याची संधी असल्याचे नमूद करत सर्व अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) प्रताप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दीपक पाटील, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment