Mumbai News: राज्यासह देशभरात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, यूबीटीचे सहा खासदार शिंदेच्या शिवसेनेत गेले या बंडखोरांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जात आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जात आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जात आहोत, देशाची परंपरा विसरून जात आहोत. चहूबाजूंनी आम्ही काय बघतोय, आज सगळी लोक विकली जात आहेत, ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, देशामध्ये सुरू आहे, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आपण काय सांगणार आहोत? असा प्रश्न त्यांनी केला.
ठाकरे पुढे महाले की, सद्या ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, देशामध्ये सुरू आहे, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आपण काय सांगणार आहोत? असा प्रश्न त्यांनी केला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा होता, त्याप्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात मार्गदर्शन केले.
… त्यांना पुन्हा निवडून देणार का?
राज्यासह महाराष्ट्रातच दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय? तर खासदार फोडणे, आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे! आमची सत्ता कशी टिकेल, यासाठी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहोत. माणसे विकली जात आहेत. मला वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने केला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. ज्यांना निवडून देण्यासाठी तुम्ही उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात, तो माणूस पन्नास-शंभर कोटींसाठी म्हणून विकला जातो. त्यांना पुन्हा निवडून देणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
देशासमोर अनेक प्रश्न
ठाकरे म्हणाले, माझ्यासमोर आकडे आहेत, खास करून जो अहवाल आज तुमच्यासाठी आणला आहे, देशात आत्महत्यांचे प्रमाण किती वाढले आहे, त्याचा आहे. शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटत आहेत. ‘नीट’ परीक्षा आणली, त्याचवेळी आपण विरोध केला होता. आता आमदार, खासदार कसे पळवले जात आहे. तसेच लहान मुले देखील पळवली जातात. मुली पळवल्या जात आहेत, त्यांचे व्यापार होत आहेत, देशासमोर आज एवढे सगळे प्रश्न उभे असताना, आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकत आहोत. आम्हाला खासदार फोडायचेत, आमदार फोडायचेत, नगरसेवक फोडायचे आहेत, असे सांगून यावर सडकून टीका केली.










