होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावदा येथील असा ही उदार शेतकरी, तब्बल दिड दशकापासून देतोय लोकांना मोफत पाणी

On: June 20, 2026 7:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Savda News: विद्यमान नगरसेवक तथा शेतकरी हेमंत महाजन यांची गेल्या ३-४ दिवसांपासून ट्यूबवेलची मोटार काही तांत्रिक कारणांमुळे बंद झाली होती, या कारणांमुळे या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नगरपालिकेने लवकरात लवकर नवीन मोटार बसवून जलदगतीने काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नगरसेवक राजेश वानखेडे व फरिद शेख युसूफ शाह व जुबेर यांनी पालिका प्रशासनाकडे केली.

या दरम्यान बाबु मेंबर रविवापेठ यांनी या भागातील लोकांना स्वत:च्या टॉंकरने पाणीपुरवठा केला. अखेर शुक्रवारी दि.१९ जून रोजी मोटर दुरुस्त झाल्याने नगरपालिकाने ती त्वरित बसविण्यासाठी आपले कर्मचारी पाठवले.परिणामी पुन्हा ट्यूबवेल सुरु झाल्याने येथील लोकांची पाणीटंचाई दूर होऊन येथे मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. गेल्या तब्बल दिड दशकापासून ते लोकांना मोफत पाणी देत आहे, एखादी तांत्रिक अडचण निर्माण झाली तर पाणी पुरवठ्यास अडथळा येतो अन्यथा महाजन यांच्यामुळे पाण्याची टंचाई परिसराला जाणवली नाही.

मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान नगरसेवक हेमंत महाजन हे त्यांच्या गावालागत असलेल्या शेताच्या कुपनलिकेतून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करतात. गेल्या १५ वर्षांपासून मदिना नगर ताजुशरिया नगर व संपूर्ण भागात मोफत पाणी पुरवठा करतात. परंतु गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांची टुबवेलची मोटार काही तांत्रिक कारणांमुळे बंद झाली होती, यामुळे या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, नगरपालिकेने लवकरात लवकर नवीन मोटार बसवून जलदगतीने काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नगरसेवक राजेश वानखेडे व फरिद शेख युसूफ शाह व जुबेर यांनी पालिका प्रशासनाकडे केली.

या दरम्यान बाबु मेंबर रविवापेठ यांनी या भागातील लोकांना स्वत:च्या टॉंकरने पाणीपुरवठा केला. अखेर दि.१९ जून रोजी मोटर दुरुस्त झाल्याने नगरपालिकाने ती त्वरित बसविण्यासाठी आपले कर्मचारी पाठवले.परिणामी पुन्हा ट्यूबवेल सुरु झाल्याने येथील लोकांची पाणीटंचाई संपुष्टात येवून त्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक हेमंत महाजन यांच्या प्रती स्थानिक नागरिक आदर व सम्मान व्यक्त करत आहेत. तसेच नगरसेवक राजेश वानखेडे व फरिद शेख युसूफ शाह व जुबेर आणि बाबु मेंबर यांच्या सुध्दा कौतुक होत आहे. सत्ताधारी व नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होवू नये, म्हणून कायम स्वरुपी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment