होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Cockroch Janta Party: परीक्षा घोटाळ्याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी जंतर मंतरवर गर्दी

On: June 20, 2026 6:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Cockroch Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर मंतर येथील पहिल्या आंदोलनानंतर आज पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती, त्याप्रमाणे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हातात ताट आणि चमचे घेऊन सहभागी झाले आहे. यापूर्वी संघटनेने कथित पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता आणि विद्यार्थी व नोकरी इच्छुकांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवरून आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, “स्पर्धा परीक्षांमधील सततच्या अनियमिततेमुळे लाखो तरुणांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करावी, तसेच दोषी यातील दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभिजित दिपके यांच्यासह आंदोलकांनी मागणी केली”. (Abhijit Dipke)

जंतर-मंतरवर दुसऱ्यांदा अंदोलन

युवकांच्या नेतृत्वाखालील संघटना कॉकरोच जनता पार्टीने (CJP) शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतरवर आपले दुसरे मोठे आंदोलन आयोजित केले. परीक्षेतील कथित अनियमितता, वारंवार होणारी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांसाठी उत्तरदायित्वाची मागणी त्यांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थक सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धतीत पारदर्शकता सुनिश्चित करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत सरकारकडे उत्तरांची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि परीक्षा व्यवस्थापनातील कथित त्रुटींबद्दल आपली चिंता व्यक्त केली. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या

आंदोलनादरम्यान, आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी आगमन झाल्यावर अभिजीत दीपके यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके म्हणाले, “आम्ही आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी येथे आलो आहोत.”

दीपकेचे आवाहन, ताट आणि चमचे आणा!

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक (Abhijit Dipke) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्यांना ताट आणि चमचे आणण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मोठ्या संख्येने लोक ताट आणि चमचे घेऊन आले आणि ते वाजवून आपला निषेध नोंदवला.

पंतप्रधान मोदींना खुले पत्र

या आंदोलनापूर्वी, अभिजीत दीपक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांना एक खुले पत्रही लिहिले होते. या पत्रात, त्यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसाठी जबाबदारीची मागणी केली आहे. दरम्यान, परीक्षा-संबंधित बाबी हाताळण्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी करत आहे.

पोलिस म्हणाले, आंदोलन बेकायदेशीर

दरम्यान दिल्लीत जंतर मंतर येथील दुसरे मोठे आंदोलन सुरक्षा अधिकाऱ्यांनी “बेकायदेशीर” घोषित केले. यासाठी दिलेली सायंकाळची ५ वाजण्याची वेळ उलटून गेली होती आणि संस्थापक अभिजित दीपके अजूनही घटनास्थळीच थांबले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी तरुण आणि पालकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घटनास्थळी यावे, असे आवाहन संस्थापकांनी केले असूनही, आंदोलकांना घटनास्थळ सोडण्यास भाग पाडण्यात आले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment