होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नरसापूर प्रकरणाचा ६० दिवसात फैसला; आरोपीला फाशीची शिक्षा

On: June 29, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Narsapur Case Verdict : पुणे येथील घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. नराधमाला अटक केल्यानंतर कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली होती, अखेर राज्याचे लक्ष लागून असलेल्या या नसरापूर प्रकरणाचा आज पुणे सत्र न्यायालयाने निकाल दिला. आरोपी भीमराव कांबळेला याला नायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर पीडितेच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले, त्यांना अवघ्या ६० दिवसात न्याय मिळाला. १ मे रोजी पुण्यातील नसरापूरमध्ये ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेने ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या नंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती.याप्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं. बाराशे पानी आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले होते. त्यानंतर मे महिन्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. अवघ्या ६० दिवसांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि आज कोर्टाने नराधमाला फाशीची शिक्षा दिली आहे.

पीडितेच्या कुटुंबाला न्याय

राज्यातच लक्ष लागून असलेल्या नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षी सुनावताच पीडित मुलीचे आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. पीडितेच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केले. निकालानंतर न्यायालया बाहेर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया देतांना, सरकारकडून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्याबाबत आम्ही समाधान व्यक्त करतो. पोलीस आणि वकिलांचे देखील मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण केले. सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा, असं नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं.

प्रकरण असे होते

दि १ मे रोजी महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात प्रत्यक्षदर्शीची साक्ष, सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली.

नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम

*१ मे २०२६ (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.

*२ मे २०२६ पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.

मे 2026 चा पहिला आठवड्यात शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय, तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.

*पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.

*१६ मे २०२६ अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

*२८ मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.

*जून २०२६ – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.

*२९ जून २०२६- आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली.

 

वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात ५९ दिवसांत न्यायप्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावून वेगवान न्यायदान देऊन नवीन बेंचमार्क तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायप्रक्रियेतील संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देऊन या प्रकरणात १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी, तपासणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. २५ जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि २९ जून २०२६ रोजी तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यानंतर अवघ्या ५९ दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा झाल्याने हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणात न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांनी सातत्यपूर्ण सुनावणी घेत वेगवान न्यायदानासाठी पुढाकार घेतला. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असून न्यायालयाने या प्रकरणातून नवा बेंचमार्क निर्माण केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या न्यायदानाबाबत माहिती देताना सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सक्षमपणे पुरावे गोळा करून न्यायालयासमोर मांडले. पोलिसांनी गोळा केलेल्या ठोस पुराव्यांमुळे फाशी शिक्षा देणे शक्य झाले. विशेष सरकारी वकील यांनीही प्रभावीपणे बाजू मांडून खटल्याची यशस्वी हाताळणी केली असे सांगत त्यांनी पोलीस दलासह सर्वांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment