होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळ रेल्वे स्थानकावर हेड टीटीईवर हल्ला; एसीमध्ये जागा न मिळाल्याने प्रवाशाचा संताप

On: June 29, 2026 6:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एसी कोचमध्ये जागा न मिळाल्याच्या कारणावरून एका स्थानिक प्रवाशाने हेड (टीटीई) तिकीट चेकर चुन्नीलाल रमेशचंद्र गुप्ता (४९) यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात गुप्ता किरकोळ जखमी झाले असून झटापटीदरम्यान शासकीय टॅबलेट, ईएफटी बुक, चष्मा, ओळखपत्र आणि सोन्याची चैन यांसह सुमारे ८८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मनीष लक्ष्मणदास शंभानी (३६, सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरुद्ध भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर नोटीस देऊन सोडले. घटनेवेळी गुप्ता हे नागपूर–मडगाव एक्स्प्रेसमध्ये एसी डब्यांची तपासणी करण्यासाठी ड्युटीवर होते. रात्री सुमारे १०.२० वाजता आरोपीने एसी कोचमध्ये जागा मागितली. मात्र आरएसीमुळे जागा उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने त्याने प्रथम शिवीगाळ केली आणि नंतर गुप्ता यांच्या चेहऱ्यावर, छातीवर व बरगड्यांवर मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याखाली जखम होऊन रक्तस्राव झाला.

घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी आरोपीला ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ताब्यात असतानाही आरोपीने स्वतःचा टी-शर्ट फाडून “मेरा बायपास हुआ है” असा आरडाओरडा करत पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येते या प्रकरणाचा पुढील तपास लोहमार्ग पोलिस करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment