होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा दुजोरा

On: June 27, 2026 12:37 PM
Follow Us:
---Advertisement---

America And India Relation: भारत आणि अमेरिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच भारताला भेट देऊ शकतात. रुबियो यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्याच्या जवळ आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या काही भारताविरुद्धच्या टिप्पणींमुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते, तसेच व्यापार करार देखील अडकला आहे. अमेरिकेला व्यापार करार लवकर करण्याची घाई आहे, परंतु भारत प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत आहे. अशातच अमेरीकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटची भारताला भेट फेब्रुवारी २०२० आणि २०२४ मध्ये सत्तेवर आल्यावर दिली होती.

भारत दौऱ्याची तयारी

एका वृत्त संस्थेने वृत्त दिले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारताला भेट देणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी याला दुजोरा दिला आहे. एका मुलाखतीत रुबियो यांनी सांगितले की, ते स्वतः ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भारत दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत आणि यासाठी लवकरच भारताला भेट देतील. रुबियो यांनी सांगितले की, ट्रम्प (Donald Trump) प्रशासन पुढील वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तयारी करत आहे. यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये वाढणारी जवळीक अधोरेखित होते, कारण दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहेत. असा दावा त्यांनी केला.

दोन्ही देशात संबंध सुधारले

रुबियो म्हणाले की, ते या वर्षाच्या अखेरीस देखील भारताला भेट देतील. व्हाईट हाऊसमध्ये वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत रुबियो म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तयारीच्या संदर्भात मी वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देईन.” भारत-अमेरिका संबंधांविषयी बोलताना रुबियो म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध दृढ आहेत आणि जी-७ शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या अलीकडील भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध सुधारले आहेत.

‘क्वाड’ बैठकीवर चर्चा

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी असेही सांगितले की, ‘क्वाड’ (Quad) बैठकीवर लवकरच चर्चा होऊ शकते. रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र देश म्हटले आहे. ते म्हणाले, “भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र देश आहे आणि पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचेही खूप चांगले संबंध आहेत, जे मला वाटते की राजनैतिक संबंधांमध्ये खूप महत्त्वाचे आहे.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment