होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ईशा फाऊंडेशन: शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय योग दिन सत्रांचे आयोजन; ३५ हजाराहून अधिक नागरिकांचा सहभाग

On: June 25, 2026 12:40 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune News: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, ईशा फाऊंडेशनने महाराष्ट्रभर १०० हून अधिक योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले. या सत्रांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था, आरोग्यसेवा संस्था, शासकीय विभाग, संरक्षण आस्थापना आणि विविध सामुदायिक ठिकाणांवर अंदाजे ३५,००० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

पुण्यामध्ये सहभागी झालेल्या प्रमुख सरकारी संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्य रेल्वे, महाराष्ट्र शासनाची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी – यशदा (YASHADA), पुणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस आणि जीएसटी (GST) भवन यांचा समावेश होता. सत्रे आयोजित करणाऱ्या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ‘हनीवेल’ (Honeywell) सारख्या कंपन्यांचा समावेश होता. तसेच, वेस्टर्न नेव्हल कमांड, आयआरसीटीसी (IRCTC), एचडीएफसी लाईफ (HDFC Life), बीडीओ इंडिया (BDO India) आणि आयपीसीए लॅबोरेटरीज (IPCA Laboratories) यांसारख्या संस्थांमध्येही राज्यभरात सत्रे आयोजित करण्यात आली. या उत्साहवर्धक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, येत्या आठवड्यात आणखी १२५ हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये १० हजार पेक्षा अधिक लोक सहभागी होतील, असे अपेक्षित आहे.

योगाचे महत्त्व आणि उपयुक्तता

योगाचे महत्त्व आणि आजच्या जगातील त्याची उपयुक्तता याविषयी भाष्य करताना, सद्गुरू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हणाले: “आंतरराष्ट्रीय योग दिन हे लक्षात घेण्याबद्दल आहे की, आपण ज्याला योग म्हणतो, ते कोणतेही तत्त्वज्ञान, विचारसरणी, श्रद्धाप्रणाली किंवा धर्म नाही. हे आंतरिक कल्याणासाठीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तुमचा धर्म, वंश, जात, पंथ किंवा लिंग कोणतेही असो, ही तंत्रे तुम्हाला सर्वोत्तम अस्तित्वाकडे घेऊन जातात – शरीर, मन, भावना, बुद्धिमत्ता आणि ऊर्जा यांच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचवतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक मानवामध्ये दडलेल्या प्रतिभेच्या अमर्याद शक्यतांना खुल्या करतात.”

देशभर योग सत्रांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून, ईशा फाऊंडेशनने देशभरात जवळपास १ हजार मोफत योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले, यामध्ये ‘नाडी शुद्धी’ आणि ‘योग नमस्कार’ यांसारख्या साधनांचा समावेश होता. सहभागी नागरिकांना ‘मिरॅकल ऑफ माईंड’ची देखील ओळख करून देण्यात आली. सद्गुरूंनी तयार केलेले हे विनामूल्य सात मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान असून, त्याद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवू शकते. मिरॅकल ऑफ माईंड ॲपच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या या ध्यानप्रक्रियेचा लाभ जगभरातील ३५ लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्त्यांनी घेतला आहे. योग किंवा ध्यानाचा कोणताही पूर्वानुभव अथवा ज्ञान आवश्यक नसल्यामुळे, ही प्रक्रिया सर्व स्तरांतील लोकांसाठी सहज उपलब्ध आहे. ही ध्यानप्रक्रिया जीवनभर विनामूल्य असून, ती (isha.sadhguru.org/in/en/miracle-of-mind) येथे उपलब्ध आहे.

देशव्यापी उपक्रमाला पूरक म्हणून, भारतातील ईशा केंद्रांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बेंगळुरू येथील सद्गुरू सन्निधीमध्ये, आदियोगींच्या सान्निध्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात ३ हजारहून अधिक सहभागी एकत्र आले. यामध्ये एनसीसी कॅडेट्स, सीमा सुरक्षा दल कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात, यंग इंडियन्स कोईम्बतूर चॅप्टरमधील ५०० विद्यार्थ्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलामधील २०० कर्मचाऱ्यांसह एकूण ७०० हून अधिक सहभागी योग आणि ध्यान सत्रांमध्ये सहभागी झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment