Mumbai News: दीपनगर विद्युत प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येणार असून भ्रष्टाचार झाला असेल तर गरज पडल्यास एसआयटी चौकशी केली जाईल, अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. दीपनगर विद्युत प्रकल्पातील १५० कोटी आणि आणखी एका ३०० कोटीं रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सरकारला आ. एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देतांना ही माहिती विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेचे अधिवेशन सुरू असून आज प्रश्नोत्तराच्या वेळात सदस्य एकनाथ खडसे यांनी दीपनगर विद्युत प्रकल्पातील
नियमबाह्य खर्च १५० कोटी आणि दुसऱ्या एका ३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली. खडसे म्हणाले, या ठिकाणी कामे न करता बिले काढणे, अर्धवट कामे करून पूर्ण बिले काढणे असे प्रकार झाले असून ते पुराव्या निशी दिले आहे, एका एक प्रकल्पात १५० व ३०० कोटींचे गैरव्यवहार होत असेल तर आपल्याकडे सात सबस्टेशन आहेत, त्यात हजारो कोटींचे गैरव्यवहार होत असतील, त्यासंदर्भात आपण चौकशी समिती नेमली आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय गैरव्यवहार होऊ शकत नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशी नेमण्याची मागणी विधान परिषदेत सरकारकडे खडसे यांनी केली.

त्यावर मा. मुख्यमंत्र्यांनी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याचे या यामध्ये काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच या प्रकरणी चौकशी सुरु असून एक महिन्यात चौकशी पूर्ण करून त्यात कुठे ही भष्टाचार होत असेल तर एसआयटी चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिली.






