Jalgaon News: पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवक म्हणून अधिक जबाबदारीने व गुणवत्तापूर्ण सेवा देऊन ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले. जिल्हा परिषद अंतर्गत परिचर वर्ग-४ या पदावर कार्यरत असलेल्या २५ कर्मचाऱ्यांना समुपदेशन पद्धतीने आरोग्य सेवक या वर्ग-३ पदावर पदोन्नती देण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषदेच्या सेवेत परिचर वर्ग-४ पदावर कार्यरत असलेले २५ कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरले होते. या कर्मचाऱ्यांना वर्ग-४ मधून वर्ग-३ मधील आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, प्रशासन अधिकारी डॉ. राजेश जैन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

एकाच वेळी तब्बल २५ कर्मचाऱ्यांना वर्ग-४ मधून वर्ग-३ मधील आरोग्य सेवक पदावर पदोन्नती मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवक म्हणून अधिक जबाबदारीने व गुणवत्तापूर्ण सेवा देऊन ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.











