Latest Weather News: जून महिन्यात अधून मधून अवकाळी पाऊस झाला, मात्र मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा गेल्या १५ ते २० दिवसांपासून आहे. हळूहळू पाऊस सक्रिय होत आहे. मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, नाशिक, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पहाटे मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने २३ जूनला महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज दिला होता, त्याप्रमाणे पाऊस पुढे सरकत आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश सामान्यतः आणि हवामान ढगाळ राहील, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. जळगावचे ही तापमान घसरलं असून ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान रत्नगिरीला काळ रेड अलर्ट दिला होता, आज उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस व वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी पावसाची दाट शक्यता वर्तविली आहे. दरम्यान २३ ते २७ जून या ५ दिवसादरम्यान महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीतील मच्छिमारांसाठी मुंबई कुलाबा हवामान केंद्राने इशारा दिला आहे.

उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह ताशी ३०-४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना , ताशी ४०-५० कि मी वेगा ने सोसाट्या चा वा रा आणि तुरळक ठि का णी हलक्या ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.






