होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पोलिसांकडून महामार्गावरील ब्लॅक स्पॉटबाबत जनजागृती; अपघात कमी करण्यासाठी पुढाकार

On: June 29, 2026 7:33 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: महामार्गावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी व वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने महामार्गावरील ब्लॅक स्पॉट ठिकाणी सूचना फलक लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात,त्या ठिकाणी नागरिक व वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी जनजागृतीपर फलक उभारण्यात आले आहेत.

या मोहिमेची सुरुवात हिरा मारोती येथून करण्यात आली असून बोहर्डीपर्यंत अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. फलकांवर ‘वेगाला आवरा, अपघात टाळा’, ‘हेल्मेट तुमचे सुरक्षा कवच आहे – नेहमी वापरा’, ‘मोबाईलवर नाही, रस्त्यावर लक्ष द्या’, ‘वेगमर्यादेचे पालन करा’, ‘सीट बेल्ट नक्की लावा’, ‘वाहने हळू चालवा, तुमचे घर… कोणीतरी तुमची वाट पाहत आहे’, ‘सावधानता हटली, दुर्घटना घडली’ असे जनजागृतीपर संदेश देण्यात आले आहेत.

या उपक्रमामुळे वाहनचालकांना अपघातप्रवण ठिकाणांची माहिती मिळण्यास मदत होणार असून सुरक्षित वाहनचालना करण्याबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास वरणगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अमित कुमार बागुल यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment