होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६ प्रभावीपणे राबवावा: सीईओ करिष्मा नायर

On: June 30, 2026 12:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेउन जिल्हा परिषद, जळगाव यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. हे अभियान १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी केले आहे.

‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’

अतिसार (Diarrhea) हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार असून, सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाय अधिक बळकट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, शिक्षण, महिला व बालविकास तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविले जाणार आहे. (Diarrhea)

 

शाळा-अंगणवाडी केंद्रांपर्यंत जनजागृती

अभियानांतर्गत तालुका ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार असून, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. गावनिहाय पाणी गुणवत्तेची तपासणी करून सर्व स्रोतांची नियमित चाचणी केली जाईल. विद्यार्थी व स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करून नळाद्वारे पुरवठा होणारे पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरोन राखण्यावर भर दिला जाणार आहे.

स्वच्छतेचे महत्त्व

या अभियानादरम्यान हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त स्थितीची शाश्वतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियानावर भर दिला जाणार असून, पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारीचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी केले आहे.

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि चांगल्या सवयींच्या माध्यमातून अतिसारमुक्त व निरोगी जळगाव घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असून नागरिकांच्या सह‌कार्यामुळे हे अभियान अधिक प्रभावी ठरेल

-राहुल जाधव, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन
जिल्हा परिषद जळगाव.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment