होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खान्देशच्या प्रवाश्यानो लक्ष द्या: भुसावळ येथून पंढरपूरसाठी धावणार विशेष गाडी

On: June 26, 2026 6:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Railway Update: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथून विशेष रेल्वे सेवा उप्लब्ध झाली आहे, त्यामुळे उत्तर खान्देश भागातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे. दरम्यान पंढरपूर येथील जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. पंढरपूरला जाणारी वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेने भुसावळसह नागपूर, नवी अमरावती, खामगाव या ठिकाणांहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे.

भुसावळ ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहचणार आहे.

नागपूर ते मिरज या मार्गावर गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष ट्रेन २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला पंढरपूरसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल.

नवी अमरावती ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी रात्री ७.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल.

खामगाव ते पंढरपूर मार्गावर गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता खामगावला पोहोचेल.

या विशेष गाड्यांमुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवाश्यांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment