Varangaon News: शहरासह ग्रामीण परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, गरिबांच्या घरात काहीच उपकरणे नसताना चाळीस हजार वीज बिल आले, शेतात असलेले रोहित्र वारंवार जळणे, नादुरुस्त होणे तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि बेकायदेशीर घरात बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, अशा विविध समस्यांबाबत त्रस्त असलेल्या नागरिकांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार सकाळी शिवसेनेतर्फे वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढून कार्यालयाबाहेर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पोलिसांची मध्यस्थी
लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतल्याने उप कार्यकारी अभियंता ग्रामीणचे एस. सी. पंचबुद्गे आणि शहर अभियंता ए. बी. कुंभारे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सामान्य नागरिकांना ज्या समस्या उद्भवल्या त्याचे निरसन करणार असल्याचे लेखी पत्र आम्हाला द्या तेव्हाच आम्ही येथून आंदोलन मागे घेऊन अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच वरणगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी दोन्ही अभियंता यांच्याशी चर्चा करून आंदोलन चिघळत असल्याचे पाहून लवकर लेखी पत्र देण्यास सांगितले. या मोर्चात शहरासह परिसरातील शेतकरी, नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते , शिवसैनिक महिला पुरुष मोठ्य संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

वीज वितरण कार्यालयावर पायी धडक मोर्चा
मंगळवारी सकाळी १० वाजता शिवसेना संपर्क कार्यालय बस स्टँड येथून चारशे ते पाचशे महिला पुरुषाच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन, विविध घोषणाबाजी करण्यात आली. बस स्टँड परिसर ते वीज वितरण कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. या मोर्चात शेतकरी, सामान्य माणूस, महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनात अभियंता पंचबुधे यांची ग्वाही
गरिबांच्या घरात काहीच उपकरणे नसताना जे चाळीस हजार वीज बिल आले ते कमी करण्यात येतील, स्मार्ट मीटर यापुढे बसविण्यात येणार नाही, शेतातील रोहित्र तत्काळ दुरुस्त करण्यात येतील, खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात यांचा होता सहभाग
शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या धडक मोर्चा आंदोलनात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख निलेश ठाकूर, शारप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, महिला तालुकाप्रमुख रेखा देशमुख, शिवसेना नगरसेविका गटनेत्या तृप्ता महाजन, नगरसेविका माला मेढे, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, अशफाख शहा, इरफान खाटिक, माजी नगरसेवक गणेश धनगर, उप तालुका संघटक सुरेश चौधरी, सुभाष चौधरी, निलेश सुरडकर, प्रशांत पाटील, युवा सेना तालुका प्रमुख विष्णू राणे, गणेश झोपे, रवींद्र कोल्हे, उपशहरप्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, सुखदेव धनगर, रवींद्र चौधरी, निलेश सुरडकर, कमलेश येवले, तळवेळचे सरपंच उल्हास भारसके, उप सरपंच किशोर कोळी, भुरा धरणे, आचेगाव ग्रा.प. सदस्य अक्षय बेंडाळे, अक्षय माळी, सुनील गोसावी, योगेश इंगळे योगेश कोळी, कृष्णा पूजारी, सर्वेश पाटील, यशवंत बढे, प्रकाश निकम, दिशा महाजन, श्रद्धा बेदरकर, जोहरे मॅडम, श्रावण जोहरे, जयंत सुरपटणे, फुलगावचे ग्रामपंचात सदस्य सचिन पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, संजय वंजारी, सागर वंजारी, अजय सोनार, प्रशांत पाटील, भगवान पाटील, राजू काठोके, पिंटू मंदावले यांच्यासह वरणगावसह परिसरातील नागरिक महिला पुरुष, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.










