होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

बघा विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा: बेंचखाली सापडलेले ४ हजार रुपये असलेले पाकीट केले परत

On: July 4, 2026 7:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता आठवी तुकडी (ई) चा विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी याला वर्गात बेंचखाली एक पाकीट दिसले. त्याने ते पाकीट उचलून खिशात न घालता वर्ग शिक्षिका सीमा ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केले. वर्ग शिक्षिकाने पाकीट उघडून पाहिले तर त्यात चक्क चार हजार रुपये आणि शाळेचे साहित्य होते. श्रीपाद माळी याचा प्रामाणिकपणा पाहून वर्ग शिक्षिकाने वर्गात सर्व विद्यार्थांसमोर श्रीपादचे कौतुक करून शाबासकी दिली. त्यानंतर सायंकाळी शाळा सुटण्याच्या अगोदर ग्राऊंडवर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर श्रीपाद माळी याला बोलावून त्याचे कौतुक करून असा प्रामाणिकपणा बाकीच्या विद्यार्थ्यांनीही करावा अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

प्रामाणिकपणाचे दर्शन

महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथील इयत्ता आठवी तुकडी (ई) चा विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी हा शुक्रवार ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वर्गात आला. बेंचवर बसल्यानंतर त्याला खाली एक पाकीट पडलेले दिसले श्रीपादने लगेच त्याच्या बाजूला बसलेला विद्यार्थी पार्थ दीपक पाटील याला सांगितले. श्रीपाद माळी याने ते पाकीट उचलून वर्ग शिक्षिका सीमा ठाकूर यांच्याकडे जाऊन ते पाकीट आमचे नसून आम्हाला हे पाकीट आमच्या बेंचखाली सापडले. सीमा ठाकूर यांनी पाकीट उघडताच त्यामध्ये चार हजार रुपये आणि शाळेचे साहित्य होते. श्रीपाद माळी या लहान विद्यार्थ्याने हे पाकीट जवळ न ठेवता ते प्रामाणिकपणाने वर्ग शिक्षिका यांच्याकडे देऊन मनात कुठलाही लोभ न ठेवता लहान वयातही एक प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन या लहानग्या विद्यार्थ्यांकडून बघायला मिळाले.

‘फी’ भरण्यासाठी आणले ४ हजार

वर्गशिक्षिका सीमा ठाकूर यांनी श्रीपाद माळी या विद्यार्थ्याने आणून दिलेले पाकीट त्यामध्ये असलेले चार हजार रुपये क्रीडा शिक्षक आशिष चौधरी यांच्याकडे देऊन पाकीट कोणाचे आहे याचा शोध घेऊन त्या विद्यार्थाला त्याचे पाकीट देण्यात आले. त्या विद्यार्थ्याने ट्विशन फी भरण्यासाठी ते चार हजार रुपये आणले असल्याची माहिती मिळाली.

सर्वानी श्रीपाद माळीचे केले कौतुक

श्रीपाद माळी या विद्यार्थ्याने शिक्षिका सीमा ठाकूर यांच्याकडे पाकीट सुपुर्द केल्यानंतर वर्गात कौतुक केले. त्यानंतर सायंकाळी शाळा सुटण्याच्या अगोदर ग्राऊंडवर प्रार्थना म्हणण्याच्या वेळेस शिक्षिका सीमा ठाकूर यांनी श्रीपाद माळी याला बोलावून बाकीच्या शिक्षकांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांसमोर श्रीपाद माळी याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

श्री समर्थ बैठकीत शिकवण

आठवीचा विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी याने सांगितले की, मी श्री समर्थ बैठकीला जातो मला समर्थ बैठकीत शिकवण दिली आहे की, खाली पडलेली वस्तु उचलू नये. ती काही पण असो.ती वस्तू आपली नाही, ती उचलू नये अशी शिकवण मला समर्थांनी दिलेली आहे. ते पाकीट माझे नव्हते म्हणून मी ते पाकीट मॅडम यांच्याकडे दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment