होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भातील अन्यायकारक परिपत्रक रद्द करा: बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

On: June 23, 2026 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

jalgaon News: महाराष्ट्रात जुलै महिन्यात १४००० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित वॉर्ड निश्चित करताना संबंधित संवर्ग व प्रवर्गाची लोकसंख्या, सामाजिक वास्तव व परिणामकारक राजकीय प्रतिनिधित्व या घटनात्मक तत्वांचा विचार न करता एक परिपत्रक काढले आहे, ते रद्द करा या मागणीसाठी जळगाव बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे व जळगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तालुका बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा:

*भारतीय राज्य घटनेने अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या वंचित घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संविधानाच्या कलम २४३ डी अंतर्गत विशेष तरतुदी केलेल्या आहेत. संबंधित समाजाला वास्तविक,प्रभावी, अर्थपूर्ण राजकीय प्रतिनिधित्व मिळावे हा मुख्य उद्देश आहे.परंतु या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करीत आहे.

*के.कृष्णमुर्ती विरुद्ध भारत सरकार,विकास कृष्णराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन,भारतीय संविधानाचे कलम १४,१५(४),१५(५),१७,३८,४६ व ३४३ डी यांचे सुध्दा उल्लंघन करण्यात आले आहे.

*दि. २५ मे व २६ मे २०२६ च्या शासन निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीच्या वॉर्डात अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्या आहे. त्या वॉर्डात आरक्षण न देता ज्या वॉर्डात अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्याच नाही, त्या ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. हा अन्याय करण्यात आला आहे.

*२५ मे व २६ मे २०२६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व पुर्वीच्या पध्दतीनेच अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी ग्रामपंचायतीत राखीव जागा ठेवण्यात याव्यात या मुद्द्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

*हा तुघलकी निर्णय रद्द न केल्यास बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य समिक्षा प्रभारी सुमित्र अहिरे यांनी या प्रसंगी दिला.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य विलास सोनवणे, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, बांभोरीचे सरपंच सचिन बिऱ्हाडे, मा.उपसरपंच खेडी नारायण सोनवणे, कानळदा ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे, उमाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश सोनवणे, शिरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुपडु जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव,उखर्डु सोनवणे, रमेश थाटे, त्र्यंबक सोनवणे, मल्हारी सरदार, शालीग्राम सोनवणे, सुभाष साळुंखे, दिलीप तासखेडकर, तबन ह्याळिंगे, भावलाल सोनवणे,दिनकर भालेराव, दिलीप जाधव, महेंद्र केदारे, प्रा.रामभाऊ सोनवणे, अशोक शिरसाटे, पी.डी.सोनवणे, चंद्रशेखर अहिरराव, कैलास म्हसाने, अशोक तिडके, डी.आर.वानखेडे, आनंदा निकम, श्रीकांत तायडे, डॉ.शाकीर शेख, अकील कासार, शेख रेहमान शेख चॉंद, किरण बिऱ्हाडे, दिनेश बिऱ्हाडे आदि विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

केतन हत्याकांडानंतर आणखी एक घटना उघडकीस; पत्नीने प्रियकर सोनूच्या मदतीने काढला मोनूचा काटा

ISRO Gets Bomb Threat: इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

23 political parties Letter to Chief Justice over SIR: निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी! देशातील 23 विरोधी पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा दुजोरा

बापरे..! शतकातील सर्वात मोठा भूकंप: मृतांची संख्या २३५ वर; जाणून घ्या कुठे घडली घटना..

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ‘नाफेड’ला नफा; डाळीचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार: केंद्रीयमंत्री अमित शहा

Leave a Comment