होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सातपूर हादरले: सुटकेस घटनेनंतर आता गोणीत सापडला युवकाचा मृतदेह; घातपात की खून? पोलीस तपास सुरू..

On: June 22, 2026 12:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: आडगाव येथील सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता सातपूर भागातील कामगार नगर परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर गोणीत भरलेला युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. नेमका मृत्यू कसा झाला याचा उलगडा पोस्टमार्टम अहवालानंतर होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने कामगारनगर हादरले असून हा घातपात की खून? यांचा पोलीस तपास करत आहेत.

अशी आहे घटना

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी कामगारनगर परिसरात एका घराच्या टेरेसवर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने कायद्याचा बल्ले किल्ला पुन्हा हादरला. दोन मजली इमारत असून त्यावरील टेरेसवर दोन पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्या मध्यभागी गोणीत मृतदेह दिसून आला. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. कामगारनगरातील साईबाबा मंदिराजवळील गल्लीत रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता एका घराच्या टेरेसवर ठेवलेल्या गोणीत मृतदेह आढळून आला, त्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घातपात की खून?

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी पंचनामा सुरू केला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून तो काही दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह गोणीत भरून टेरेसवर टाकण्यात आल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह तेथे कसा आणण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमने याठिकाणी पाहणी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment