Pune Ketan Murder Case: पुणे केतन हत्या प्रकरणात आरोपीचे वेगवेगळे वक्तव्य समोर येत असतानाच आता प्रकरण आता आणखी हागुंतागुंतीचे बनले आहे, पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात समोर आले आहे की, आरोपी चेतनची चौधरी याची गोयल कुटुंबाशी मैत्री क्रिकेटच्या माध्यमातून झाली होती. या प्रकरणी सियाच्या भावाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान सोशल माध्यमात चेतनचा बक्षीस घेतांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
क्रिकेटमुळे गोयल कुटुंबियांच्या ओळख
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपी चेतन चौधरी आणि गोयल कुटुंब यांचा संपर्क कसा आला, हे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटमधील समान आवडीमुळे चेतन चौधरी आणि सियाचा भाऊ साहिल यांच्यात मैत्री झाली. यातूनच साहिलच्या माध्यमातून सिया आणि चेतन यांची भेट झाली.
दरम्यान, लोहगड हत्या प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी साहिलची १० तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यात पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला सिया आणि चेतनच्या नात्याबद्दल अनेक महिन्यांपासून माहिती होती आणि केतनशी साखरपुडा झाल्यामुळे त्याने सियाला हे नाते संपवण्याचा आग्रह केला होता.
क्रिकेटच्या मैदानावर जुळली मैत्री
हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे की, सियाचा भाऊ साहिल आणि चेतन यांची पहिली भेट २०२४ मध्ये क्रिकेटमुळे झाली. पोलीस सूत्रांनी सांगितले, “ते एकत्र क्रिकेट खेळायचे. नंतर, साहिलच्या माध्यमातून चेतनची सियाशी मैत्री झाली.” तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, खेळाशी संबंधित नाते म्हणून जे सुरू झाले ते हळूहळू मैत्रीत बदलले, ज्यामुळे चेतनचा गोयल कुटुंबाशी संपर्क आला. तपासादरम्यान, साहिलला या नात्याबद्दल कधी कळले आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची माहिती होती का, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत होते.

लग्नाची तयारी सुरू असतानाही चेतनशी संपर्क
तपासानुसार, केतनसोबतच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाही सिया आणि चेतन एकमेकांच्या जवळ राहिले होते. पोलिसांनी सांगितले की, सिया लग्नाच्या तयारीत सक्रियपणे सहभागी झाली होती, ती वारंवार केतनच्या कुटुंबाला भेट देत असे आणि समारंभाच्या नियोजनात रस घेत होती. तिने केतनसोबत बालीमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटचेही नियोजन केले होते. दरम्यान, तपासकर्त्यांच्या दाव्यानुसार सिया आणि चेतन सतत संपर्कात होते. जानेवारी ते जून दरम्यान, त्या दोघांनी कथितरित्या २ हजारहून अधिक फोन केले आणि अंदाजे २३८ तास बोलण्यात घालवले.
पोलिसांच्या सूत्रांनी असेही सांगितले की, केतन टक्कल पडल्यामुळे विग वापरतो हे कळल्यानंतर सिया त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. तपासकर्त्यांनी सांगितले की, केतनने केसांवर महागडे उपचार करून घेतले होते. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, तो केसांचा एक छोटा तुकडा वापरतो याची गोयल कुटुंबाला आधीच कल्पना होती.






