होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ketan Agrawal Death : केतन अग्रवाल हत्याकांडात मोठी अपडेट,  केतनला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्षानंतर सिया करणार होती चेतनसोबत लग्न

On: June 28, 2026 12:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Ketan Agrawal Death : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासत मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपासात या दोघांच्या ‘मास्टरप्लॅन’चा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल  आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचाच कट रचला नव्हता, तर हत्येनंतर पोलिसांच्या संशयापासून कसे वाचायचे, याचेही नियोजन केले होते, असे तपासात समोर आले आहे. केतनची हत्या केल्यानंतर लगेच लग्न केल्यास पोलिसांना आणि कुटुंबियांना संशय येईल,  त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी सिया आणि चेतनने हत्येनंतर लगेच एकत्र न येता, तब्बल दोन ते तीन वर्षे थांबून मगच लग्न करण्याचे ठरवले होते. इतकेच नव्हे तर, पोलिसांच्या हाती कोणताही डिजिटल पुरावा लागू नये म्हणून व्हॉट्सॲपवरील कोणते मेसेज डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे, याची स्क्रिप्ट त्यांनी आधीच ठरवली होती. त्यानुसार त्यांनी मेसेजची पूर्ण काळजी घेतली होती.

 

हा संपूर्ण गुन्हा अपघाताचा वाटावा असा आरोपींचा प्रयत्न होता आणि अटकेनंतरही ते पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन्स आणि त्यांच्या भेटीच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती गोळा केली. या भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना या गुंतागुंतीच्या कटाचा उलगडा करण्यात यश आले.

 

या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी आणि अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे, ज्या तरुणाशी लग्न ठरणार होते त्याचा इतक्या क्रूरपणे बळी घेऊनही मुख्य आरोपी सिया गोयल हिला या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढा मोठा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आणि अटक झाल्यानंतरही सिया पोलीस कोठडीत एकदाही रडलेली नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नसल्याने पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.या प्रकरणात पोलीस आता अधिक तांत्रिक पुरावे गोळा करत असून, न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

 

डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम उलगडला

दरम्यान, या थरारक घटनेचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक ‘डमी पुतळा’ (मानवी आकाराची प्रतिकृती) घेऊन लोहगडावर पोहोचले होते. रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी 10:30 वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. केतन अग्रवाल याला नेमके कशा प्रकारे दरीत ढकलले गेले, याचा तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

रायगडला तडाखा: ३ ठार तर ५ बेपत्ता, २०० पर्यटकांची सुरक्षित सुटका; १४ गावांतील ९३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

अतिवृष्टीचा कहर: ४ दिवसात १३ जणांचा मृत्यू; मंत्री गिरीश महाजन यांची विधान परिषदेत माहिती

अतिवृष्टीचा धोका: शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा: देवेंद्र फडणवीस

पुण्यात मावळ परिसरात दरड कोसळली, १ ठार तर २३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

कठोर परिश्रमाला यश: यज्ञेश इंगळेने पटकावला राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचा ‘सुपरस्टार रँक’

उद्याचे हवामान: जळगावमध्ये ‘असे’ असेल हवामान; राज्यात कुठे अतिवृष्टीचा इशारा दिला ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment