होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिक, धुळे, नंदुरबारला उद्या येलो अलर्ट; ‘या’ ५ जिल्ह्याना दिला ‘रेड अलर्ट’

On: July 4, 2026 5:40 PM
Follow Us:
---Advertisement---

दिगंबर मराठे
Lestest Weather Update: जळगाव जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहिले असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे, उद्या मध्यम पावसाची शक्यता असून दि. ६ जुलैला जळगावमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. जामनेर, अमळनेर आणि बोदवड या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच उद्या नाशिक, धुळे आणि नंदुरबारला येलो अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकला आज रेड अलर्ट असून ५ आणि ६ जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. रत्नागिरी आणि मुंबईत धुवाँधार पाऊस झाला गेल्या २४ तासात रत्नागिरीत ९१.६ तर मुंबईमध्ये ९०.२ मिमी पावसाची नोंद झाले आहे.

‘या’ ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

दरम्यान मुंबई सह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, उद्या ही हवामान विभागाने अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून पालघर, ठाणे, मुंबईसह पुणे आणि सातारा घाट परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पालघरला ४ ते ६ असा तीन दिवसांचा रेड अलर्ट दिला आहे. तर रायगड आणि पालघर यांना ६ जून रोजी रेड अलर्ट दिलेला आहे. दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ४ ते ९ जुलैला येलो अलर्ट दिला आहे. ४ ते ६ जुलै आणि विदर्भात ४ ते ७ जुलैला येलो अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दि.०५ जुलै रोजी कोकण-गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे ०६ जुलैला कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. ०७ जुलैला कोकण-गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.

कुलाबा हवामान विभागाचा इशारा

०४ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० किमी) वाहण्याची शक्यता. कोकण-गोवा किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी (झोतासह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची व वादळी हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

०५ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच लगतच्या समुद्रात ताशी ४०-५० किमी (झोतासह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची आणि खराब हवामानाची शक्यता आहे.

०६ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा किनारपट्टी आणि लगतचा पूर्व-मध्य व ईशान्य अरबी समुद्र या भागात ताशी ४०-५० किमी (झोतासह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची आणि खराब हवामानाची शक्यता आहे.

०७ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच लगतच्या समुद्रात ताशी ४०-५० किमी (झोतासह ६० किमी) वेगाने वारे वाहण्याची आणि खराब हवामानाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

रायगडला तडाखा: ३ ठार तर ५ बेपत्ता, २०० पर्यटकांची सुरक्षित सुटका; १४ गावांतील ९३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

अतिवृष्टीचा कहर: ४ दिवसात १३ जणांचा मृत्यू; मंत्री गिरीश महाजन यांची विधान परिषदेत माहिती

अतिवृष्टीचा धोका: शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा: देवेंद्र फडणवीस

पुण्यात मावळ परिसरात दरड कोसळली, १ ठार तर २३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

उद्याचे हवामान: जळगावमध्ये ‘असे’ असेल हवामान; राज्यात कुठे अतिवृष्टीचा इशारा दिला ‘ते’ जाणून घ्या

Nagpur Crime News : चोरट्याचा प्रताप! चक्क एसटी महामंडळाची ई-बस चोरली; एका चीपमुळं सापडला जळ्यात

Leave a Comment