होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पुण्यात मावळ परिसरात दरड कोसळली, १ ठार तर २३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

On: July 6, 2026 3:40 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune Landslide: मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना लेक परिसरातील पाटण गावात सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. आहे. एका घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात होत आहे. त्यात १ ठार तर २३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ५ व्या बटालियनकडून मदत मागण्यात आली. त्यानुसार, एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश असलेले ३० सदस्यीय पथक तैनात करण्यात आले. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तर तुरळक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अधूनमधून ७०-८० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

पुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वाहतूक विस्कळीत

दरम्यान पुण्यात घाटमाथा परिसरात अति मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक थांबविली आहे. मुबईकडे जाणाऱ्या नागरिकांनी योग्य ती माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. पुणे -मुंबई एक्सप्रेस वे आणि जुना पुणे -मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला. तसेच वाहतूक वळवण्यात आली. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अंशतः पुन्हा सुरू करण्यात आला.

दरडी कोसळल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

घाट माथा परिसरात पाऊस पडत असून पावसानंतर दरड कोसळण्याची घटना सोमवारी पहाटे समोर आली आहे, त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या भोर घाट सेक्शनवर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे, ज्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तसेच वळवण्यात आल्या असून वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि काही गाड्या अंशतः चालवण्यात आल्या. रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी ट्रेनची नवीनतम स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

रायगडला तडाखा: ३ ठार तर ५ बेपत्ता, २०० पर्यटकांची सुरक्षित सुटका; १४ गावांतील ९३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

अतिवृष्टीचा कहर: ४ दिवसात १३ जणांचा मृत्यू; मंत्री गिरीश महाजन यांची विधान परिषदेत माहिती

अतिवृष्टीचा धोका: शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा: देवेंद्र फडणवीस

उद्याचे हवामान: जळगावमध्ये ‘असे’ असेल हवामान; राज्यात कुठे अतिवृष्टीचा इशारा दिला ‘ते’ जाणून घ्या

नाशिक, धुळे, नंदुरबारला उद्या येलो अलर्ट; ‘या’ ५ जिल्ह्याना दिला ‘रेड अलर्ट’

Nagpur Crime News : चोरट्याचा प्रताप! चक्क एसटी महामंडळाची ई-बस चोरली; एका चीपमुळं सापडला जळ्यात

Leave a Comment