Manak Jewellers Special Article: भारतीय संस्कृतीत शुभतेचे प्रतीक असलेल्या सुवर्ण आभूषण खरेदीला प्राचिन काळापासून विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार, सुवर्ण (सोने) आभूषण खरेदी अत्यंत पवित्र आणि समृद्ध मानली जाते. हिंदू संस्कृतीनुसार, सोने हे लक्ष्मीदेवीचे आणि विष्णूचे प्रतीक मानले जाते. ज्यामुळे ते सौभाग्य, पवित्रता आणि समृद्धीचे लक्षण आहे. अशा या सुवर्ण व्यवसायात चोपडा शहरातील टाटीया परिवार पाच पिढ्यांपासून कार्यरत असून विश्वासाची परंपरा त्यांच्याकडून सार्थपणे जपली जात आहे. माणक ज्वलर्सच्या माध्यामातून ते आजतागायत ग्राहकांचा विश्वास पात्र ठरले आहेत.
मूळ राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील खिचन या छोट्याशा गावातून टाटीया परिवार स्वातंत्र्यपूर्व काळात चोपडा येथे व्यावसायानिमित्त आलेत. याठिकाणी स्थिर होत अत्यंत संघर्षाच्या काळात फुलचंदजी टाटीया यांनी 1893 मध्ये सुवर्ण व्यवसायास सुरुवात केली. नवीन शहर, नवीन राज्य आणि नवीन भाषा असतांनाही फुलचंदजी जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या मातीत सहज रमले आणि आपल्या मितभाषी स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपलं घर केलं. त्यांचा हा स्वभावच त्यांच्या व्यवसायाला चालना देणारा ठरला. स्नेह, विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अनेक अडणींवर मात करत त्यांनी व्यवसायाचा पाया मजबूत केला.
त्यानंतर आसंदराजजी टाटीया यांनी संस्थेला पूरक पोषण देत संस्थेच्या विस्ताराला चालना दिली. त्यानंतर पुढच्या पिढीतील प्रवीणजी टाटीया यांनी व्यवसायाची नवीन रुपात मुहूर्तमेढ रोवत माणक ज्वेलर्स नावारुपास आणले आणि जे अल्पावधितच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. विश्वास आणि आधुनिकतेचा उत्तम संगम प्रवीणजी यांनी माणक ज्वलर्समध्ये घडवून आणला आहे.
व्यवसायाला दिले आधुनिक स्वरुप
पाच पिढ्यांपासून सुरु असलेल्या या व्यवसायात प्रवीणजी टाटीया यांनी काळानुरुप बदल घडवत व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माणक ज्वलर्सने वाढलेली स्पर्धा लक्षात घेता व्यवसायाला आधुनिक स्वरुप देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शोरुममध्ये बसविण्यात आलेले अत्याधुनिक कॅरेटोमीटर मशीन. अत्याधुनिक अशा या मशीनमध्ये सोन्याची खरी गुणवत्ता ओळखली जाते. ज्यातून ग्राहकांना सोन्याची खरी गुणवत्ता कळते आणि त्यातून ग्राहक आणि माणक ज्वलर्सचं नातं अधिक घट होतं. यासह ग्राहकांच्या हिताकडे विशेष लक्ष देत शोरुममध्ये एचयुआयडी हॉलमार्क असलेले स्वर्ण आणि चांदीचे आभूषण ग्राहकाला उपलब्ध करुन देले जातात. जे शुद्धता आणि गुणवत्तेची हमी देतात.
विश्वास आणि नव्या पिढीची कल्पकता
व्यवसायाच्या या वाटचालीत प्रवीणजी यांच्या सोबत त्यांची पुढची पिढी म्हणून त्यांचे चिरंजीव नवीन टाटीया हे देखील कार्यरत आहेत. मुंबई, पुणे येथे उच्चशिक्षण घेतलेले नवीनजी यांनी एमबीए आणि हिरे आणि कलर स्टोन विषयात विशेष प्रावीण्य मिळविले आहे. शिक्षणाचा आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगम नवीन टाटीया यांनी घडवून आणत माणक ज्वलर्सची नवी ओळख निर्माण केली आहे. वडिलांप्रमाणेच ते देखील ग्राहकांच्या समाधानाला आणि विश्वासाला प्राधान्य देतात.
अनेकांना दिला रोजगार
टाटीया परिवाराने व्यवसायाबरोबर समाजाची बांधिलकी लक्षात घेत आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. अनेकांना त्यांनी व्यवसायात मदत देखील केली आहे. सध्या प्रतिष्ठीत अशा माणक ज्वेलर्समध्ये 30 पेक्षा आधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम माणक ज्वेलर्सने केले आहे.
– विकास चव्हाण,
डिजिटल एडिटर, शौर्य मराठी मीडिया.
मो. 9370847909






