होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळले; हवामानाच्या भोवऱ्याने बद्दली दिशा..

On: July 7, 2026 12:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: हवामान विभागाने ६ ते ८ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला. तसेच सोमवारी आणि मंगळवारी हवामान खात्याने नाशिकच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट दिला होता, त्याअनुषंगाने ढगफुटीचा इशारा दिला होता, तसेच पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत ठरणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता भोवरा वेगळ्याच दिशेने पुढे सरकला आहे. त्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट तूर्तास टळल्याचे दिसत आहे.

महत्त्वाचे म्हणजे सोमवारी पालघरमध्ये सुमारे ४५० मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) भागात सरकल्याचे दिसत आहे. त्यामळे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळल्याचे दिसत आहे. मात्र नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आज ७ जुलैला कायम आहे.तर उद्या ८ जुलै रोजी नाशिक घाटमाथ्याला येलो अलर्ट आहे. घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे.

घाटमाथा असेलेला इगतपुरी-त्र्यंबक भाग

दरम्यान सोमवारी नाशिकमध्ये एका दिवसात ३५० मिलीमीटर म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसार नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर , इगतपुरी, पेठ सुरगाणा या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्रभर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसला. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहराच्या परिसरात विश्रांती घेतली असली तरी घाटमाथा परिसरात अति मुसळधार पाऊस अंदाज असल्याने त्र्यंबकेश्वर, कसारा आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे.

नाशिकच्या घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तुलनेने समाधानकारक राहिली आहे. तरीदेखील नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मंत्री महाजन यांची त्र्यंबक आणि इगतपुरीला भेट

नाशिकला दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी रात्रीच मुंबई येथून नाशिकला रवाना झाले. मंत्री महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिककडे येत असतानाच अतिवृष्टी होणाऱ्या इगतपूरी त्र्यंबकेश्वर भागाचा दौरा केला. तसेच ज्या भागामध्ये पाणी साचणार आहे तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असलेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मध्ये विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांचा आढावा घेतला आहे. अतिवृष्टी भागातील अनेक कटुंबीयांना रात्री जिल्हा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले.

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती

*दि. ६ ते १२ जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यामध्ये; ६ ते ८ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ६ ते ७ जुलै दरम्यान मराठवाडा आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये; तसेच ६ ते ९ जुलै दरम्यान गुजरात प्रदेशात बऱ्यापैकी व्यापक ते व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*दि. ९ ते १२ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ८ ते १२ जुलै दरम्यान मराठवाडा आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये; तसेच १० ते १२ जुलै दरम्यान गुजरात प्रदेशात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*दि. ६-७ जुलै आणि ९ जुलै रोजी गुजरात प्रदेश व कोकण-गोव्यात; ६-९ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ६ जुलै रोजी मराठवाड्यात; ६-८ जुलै दरम्यान सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ८ जुलै रोजी गुजरात प्रदेश आणि कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

*दि.६ आणि ७ जुलै रोजी कोकण आणि गुजरात राज्यात; तसेच ६ ते ८ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment