Jalgaon News: नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा, या पाहणीसाठी शिवसेना पक्षाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने जळगाव तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे आणि तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
ज्यांचे १२ अंकी (NPH) रेशन कार्ड बनून हमीपत्र जोडुन पुरवठा शाखेत कागदपत्रे जमा केले आहे,. तरीही धान्य अजूनही सुरु झालेले नाही, अशांना धान्य पुरवठा करावा, नागरिकांना नविन कार्ड व १२ अंकी कार्ड करून मिळावे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, एकल महिला,विधवा महिला योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विविध योजनांपासून वंचित असलेल्या महिला व पुरुषांना कागदपत्रांसह आज उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे नागरिक उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे, यांच्यासह युवा सेना तालुका प्रमुख किरण पवार, भगवान धनगर, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, महेश अहिरे, खुशाल अहिरे, स्वप्नील राजपूत, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, शरद सोनवणे, अरुण कोळी, योगेश घुगे, चंद्रकांत पाटील, योगेश चौधरी, डॉ.रमाकांत कदम, भीमराव पांडव व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







