होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यात एकीकडे मुसळधार, तर जळगावमध्ये उकाडा; जाणून घ्या, उद्या ‘कसे’ असेल हवामान

On: July 7, 2026 5:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यात एकीकडे धुवाँधार पाऊस होता असून दुसरीकडे जळगावमध्ये उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहे. जळगावमध्ये अधूनमधून ऊन सावलीचा खेळ सुरू होता, आज तापमान देखील ३३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. वातावरणात उकड जाणवत होता. उकाड्यापासून अद्याप जळगावकरांची सुटका नाही. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हीच परिस्थिती धुळे आणि नंदुरबार मध्ये देखील आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात देखील दमदार पावसाची वाट शेतकरी आणि नागरिक बघत आहे.

उद्या जळगावला हलका-मध्यम पाऊस

जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने ६ आणि ७ जुलैला येलो अलर्ट दिला, त्यामुळे काही ठिकाणी ६०-७० किमी तास वेगाच्या जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. मात्र पावसाने जळगावचा काही भाग सोडला तर जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात झालेली तूट भरून काढणे तूर्तास तरी शक्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यातचं शेतकरी देखील दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. दरम्यान बुधवारी ८ जुलै रोजी हलका ते मध्यम पाऊस.बरसण्याचा अंदाज आहे.

धुळे आणि नंदुरबार मध्ये ६ व ७ जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मात्र याठिकाणी देखील काही भाग सोडला तर उर्वरित ठिकाणी समाधानकारक पावसाची वाट शेतकरी आणील नागरिक बघत आहेत. बुधवारी देखील या ठिकाणी हलका आणि माध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण खान्देशमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक अतिमुसळधार पाऊस कोसळत आहेत.

उद्या राज्यातील असे असेल हवामान

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण किनारपट्टीवर ६०-७० किमी/तास (झोतासह ८० किमी/तास) वेगाने वारे वाहण्याची आणि वादळी हवामानाची शक्यता आहे. तसेच, दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ५०-६० किमी/तास (झोतासह ७० किमी/तास) वेगाने वारे वाहण्याची आणि वादळी हवामानाची शक्यता आहे.

सर्वाधिक २०३ मिमी पालघरला

राज्यात आज दि ७ जुलैला, म्हणजेच गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात ११६.४ रायगड जिल्ह्यात १०८.७ मुंबई उपनगर जिल्ह्यात ९०.४ आणि पुणे जिल्ह्यात ७०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

राज्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (दि ७ जुलै)

ठाणे, ११६.४,रायगड 108.7, रत्नागिरी 58.4, सिंधुदुर्ग 37.1,पालघर 203.3 , नाशिक 36, धुळे 9.6, नंदुरबार 6.4, जळगाव 8.8, अहिल्यानगर 26.8, पुणे 70.9, सोलापूर 3.6, सातारा 46.6, सांगली 13.4, कोल्हापूर 47.7, छत्रपती संभाजीनगर 14.1, जालना 5.6,बीड 6.2, लातूर 0.7, धाराशिव 6.8, नांदेड 0.5, परभणी 1, हिंगोली 1.9, बुलढाणा 4.8, अकोला 4.6, वाशिम 1.3, अमरावती २.३,यवतमाळ 0.8, वर्धा 0.8, नागपूर 1.1, भंडारा 1.4, गोंदिया 1.5,चंद्रपूर 0.6 आणि गडचिरोली जिल्ह्यात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment