Latest Weather News: राज्यात बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे, उद्या पुणे आणि सातारा घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात १ जून पासून राज्यात सरासरी ३३२ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत दिलेल्या प्राप्त माहितीनुसार मागील २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस झाला आहे. आज रायगडाला येलो अलर्ट दिला होता. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे.
जळगावमध्ये शुक्रवारी हलका पाऊस
उद्या राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात आणि पुणे, सातारा येथील घाटमाथा परिसर सोडला तर बहुतांश भागात हलका आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. जामनेर ७ सेंमी पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे हलका पाऊस पडला आहे.

रायगड जिल्ह्या खालोखाल ठाणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३७.२ मिमी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ३२.४ मिमी, रत्नागिरीमध्ये ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात १ जून पासून राज्यात सरासरी ३३२ मिमी पाऊस झाला आहे,
राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या समाधानकारक पावसामुळे मान्सूनची सक्रियता काही भागात कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उद्या पावसाची तीव्रता कमी
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, आदींसह अनेक भागात हलका माध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान काही जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट दिला आहे.उद्या १० जुलैला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी, विदर्भातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.









