होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amalner News: लोक वर्गणी- पाणीपट्टीवरील व्याजाचा विषय पुन्हा ऐरणीवर

On: July 19, 2026 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शनिवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून “लोक वर्गणी” या नावाखाली बेकायदेशीर व बळजबरीने कर वसुली करीत आहे. सदर वसुलीस कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ती त्वरित रद्द करण्यात यावी, यावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच सन २०२४-२०२५ पासून नगरपरिषद आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असतानाही ३१ डिसेंबर पासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर २ टक्के दराने व्याज आकारत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी पाणीपट्टीवरील २ टक्के व्याज आकारणी देखील रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिनांक १७/१२/२०२४ व २२/४/२०२५ आणि ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनावेळी “पुढील काळात लोक वर्गणी व २% व्याज आकारणी केली जाणार नाही” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी नगरपरिषदेने तातडीने याची दखल घेऊन दोन्ही वसुली बंद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी शिंदे यांनी या प्रसंगी आम्ही सकारात्मक असून योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अ‍ॅड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख व ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

हवामान स्थिती: पाऊस बघतोय परीक्षा, धरणाची पाणी पातळी घटली; जळगावात कधी होणार पाऊस ‘ते’जाणून घ्या

अमृतमहोत्सव कार्यक्रम: एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना निमंत्रण, जळगावमधील या दोघा दिग्गजांचे मनोमिलन होणार का?

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाचोरा जोडण्याचा प्रयत्न हाणून पाडू: आ किशोर पाटील

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना जळगावमध्ये पाठिंबा; सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने

हवामान स्थिती: पाऊस पडेना, उकाडा सोसेना; जळगावचे हवामान कसे ‘ते’ जाणून घ्या!

कुपोषित बालक- मातांना दिलासा: नंदुरबारमध्ये ३९ खाटांचे स्पेशल नवजात अर्भक विभागासह मातृदूध बँक सुविधा

Leave a Comment