होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Rohingya Boat Tragedy: मान्सूनच्या लाटांचा हाहाकार! बंगालच्या उपसागरात 2 बोटी बुडाल्या; 500 जणांच्या मृत्यूची भीती

On: July 16, 2026 4:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Rohingya Boat Tragedy: म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या समुदायातील लोकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात बुडाल्या आहेत. हृदयद्रावक अशा या घटनेत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

 

संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या दोन्ही बोटी जूनच्या अखेरच्या आठवड्यात म्यानमारच्या रखाईन प्रांतातून निघाल्या होत्या. या बोटींमध्ये रोहिंग्या शरणार्थींची संख्या सर्वाधिक होती. UNHCR आणि IOM नं दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरानं सागरी प्रवास आणखी जोखमीचा झाला. मृतांचा नेमका आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही. मात्र, दोन्ही बोटीमध्ये 500 पेक्षा जास्त लोकं होती. यातील काही जण सीमेपलीकडे असलेल्या बांग्लादेशच्या रेफ्युजी कॅम्पमधून आले होते. जवळपास 250 प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीचा संपर्क प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच तुटला होता. तर 280 प्रवाशांना घेऊन जाणारी दुसरी बोट म्यानमारच्या अयेयारवाडी किनाऱ्याजवळ बुडाली.

हिंसाचारापासून वाचण्यासाठी रोहिंग्या निर्वासित अनेकदा धोकादायक सागरी मार्गांचा अवलंब करतात. जून आणि जुलै महिन्यांतील मान्सूनमुळे समुद्रात प्रचंड लाटा उसळण्याची भिती असते. क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या बोटींचे अपघात या निर्वासितांसाठी जीवघेणे ठरले आहेत. मदत आणि बचाव यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

Leave a Comment