Ketan Murder Case: पुण्यातील केतन हत्याकांडातनवीन माहिती समोर आली आहे. दर्म्य केतन हत्या प्रकरणात केतनच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक भावनिक पत्र लिहून जलद न्यायाची मागणी केली आहे. केतनचे पिता विशाल अग्रवाल यांनी ईमेलद्वारे राष्ट्रपतींना विनंती आहे की, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि दोषींना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा देण्यात यावी. या पात्रात केतनच्या वडिलांनी भावनिक आवाहन करतांना २० दिवसात मुलगा आणी वडील गमविल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही केतनच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी केली होती.
मुलगा केतनला न्याय द्या
आपल्या पत्रात विशाल अग्रवाल यांनी लिहिले आहे की, ते ही विनंती एक व्यावसायिक किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून नव्हे, तर आपला मुलगा गमावलेले एक वडील म्हणून करत असून, केतनच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे आणि त्यांना दररोज एकच प्रश्न सतावतो: त्यांच्या मुलाला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पत्राचा मजकूर असा
ईमेल द्वारे पाठविलेल्या त्यांनी पत्रात आणखी एका वैयक्तिक दुःखाचा उल्लेख केला आहे, की केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसांत त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांना नातवाच्या अकाली मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी सांगितले की, अवघ्या २० दिवसांत त्यांनी आपला मुलगा आणि वडील दोघांनाही गमावले, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशी भावांना व्यक्त केली असून तसे वृत्त अमर उजाला दैनिकाने दिले आहे.

दरम्यान राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे कुटुंब कोणत्याही विशेष सवलती किंवा विशेषाधिकारांची मागणी करत नाही. त्यांची एकमेव मागणी आहे की, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, जेणेकरून न्यायाला विनाकारण विलंब होणार नाही आणि दोषींना त्वरित शिक्षा ठोठावता येईल. न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे पीडित कुटुंबाचे दुःख अधिकच वाढते. शिवाय, समाजात हा संदेश देणे महत्त्वाचे आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही आणि गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा झाली पाहिजे.
पत्राच्या शेवटी, त्यांनी लिहिले आहे की, त्यांच्या कुटुंबाने सर्वस्व गमावले आहे आणि न्याय हीच त्यांची एकमेव आशा आहे. त्यांनी विनंती केली की त्यांच्या मुलाच्या प्रकरणाकडे ‘केवळ एक फाईल’ म्हणून पाहू नये, तर त्याकडे संवेदनशीलतेने आणि प्राधान्याने पाहिले जावे, असे भावनिक आवाहन केले.










