होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

On: July 18, 2026 1:28 PM
Follow Us:
---Advertisement---

CJP Protest Jantar Mantar: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या तब्येतीचे कारण देत पोलिसांनी आज सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. आदोलकांनी वांगचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप केला आहे. या विरोधात अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. ते आजपासून उपोषण सुरू करणार आहेत. अभिजीत यांचा दावा आहे की, त्यांना मारहाण झाली आणि ते पोलिसांच्या ताब्यातून पळून जंतर मंतर येथे पोहोचले आहे. दीपके म्हणाले की, ‘संसद चलो’ मोहीम २० जुलै रोजी होणार आहे. त्यांनी लोकांना प्रत्येक राज्यात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी सकाळी, दिल्ली पोलिसांनी गेल्या २० दिवसांपासून जंतर मंतर येथे उपोषणावर बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले. त्यानंतर, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले.

सोनम वांगचुक यांच्यावर दिल्ली पोलिसांचे निवेदन

दरम्यान जंतर मंतर येथील गोंधळानंतर डीसीपी नवी दिल्ली यांनी ट्विट केले की, “माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही कारवाई सुरक्षितपणे पार पाडली. आम्ही जंतर मंतर येथे उपस्थित असलेल्या आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर शांततेने जागा रिकामी करावी.”

तर रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने स्पष्ट केले की, दीर्घकाळच्या उपवासामुळे आणि निर्जलीकरणामुळे ते खूप अशक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी, त्यांचे महत्त्वाचे आरोग्य मापदंड पूर्ववत करण्यासाठी त्यांना सतत देखरेख, चाचण्या आणि उपचारांची आवश्यकता आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा इशारा

सोनम वांगचुक यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंगमो यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “माझ्या आणि माझ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतेही औषध देऊ नये.” आंगमो म्हणाल्या, “ते सफदरजंग रुग्णालयात आहेत. माझ्या परवानगीशिवाय त्यांना काहीही देण्यास मी मनाई केली आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणताही उपचार सुरू करू नये. काही अनुचित प्रकार घडल्यास, मी सर्वांना जबाबदार धरेन.” त्या पुढे म्हणाल्या, “काल त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना रुग्णालयात आणण्याची काहीच गरज नव्हती. कलम ३२ अंतर्गत हा माझा अधिकार आहे. माझ्या आणि माझ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय काहीही दिले जाऊ शकत नाही.”

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार: अभिजीत दीपक

या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपक म्हणाले, “सोनम वांगचुक सरांना घेऊन गेल्याने हे आंदोलन संपेल असे त्यांना वाटत असेल, तर त्यांचा गैरसमज आहे. आम्ही इथेच थांबणार असून दि. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार आहोत.” ते म्हणाले, “आतापर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, पण या घृणास्पद कृत्यानंतर, आम्ही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.”

पोलिसांनी मला मारहाण केली: दीपके

अभिजीत दीपक म्हणाले, “सकाळी ७ वाजता मी फ्रेश होण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा पोलिसांचे गुंड आले. त्यांनी सोनम सरांना शिवीगाळ करत ओढत नेले. २० दिवसांपासून उपोषणावर असलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ओढत नेले. ते त्यांना कुठे घेऊन गेले हे आम्हाला माहीत नाही.” बातमी मिळताच मी जंतर मंतरकडे जात होतो, आणि पोलिसांनी माझ्यावर हल्ला केला. हे पोलीस नाहीत, हे आरएसएसचे गुंड आहेत. मी नुकताच परदेशातून माझ्या देशात परत आलो होतो, मी काही गुन्हेगार आहे का? या लोकांनी मला रस्त्यावर मारहाण केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

Leave a Comment