होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: ग.स. अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड बिनविरोध

On: July 15, 2026 7:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: येथील ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी धर्मराज पाटील यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीनंतर संचालकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

जळगाव येथील सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी काही दिवसांपूवच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या अनुषंगाने आज दि. 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता ग.स. सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली.

 

यात सहकार व लोकसहकार गटाने एकत्र येत अध्यक्षपदासाठी रागिणी चव्हाण यांना तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज असल्याने अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.

 

यावेळी सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील, माजी अध्यक्ष अजबसिंग पाटील, संचालक सुनिल सुर्यवंशी, महेश पाटील, अजय देशमुख, विजय पवार, व्यवस्थापक वाल्मिक पाटील यांच्यासह संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रागिणी चव्हाण यांनी सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. पतपेढीचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने चालवून सभासदांच्या आर्थिक हितासाठी निर्णय घेतले जातील. तसेच ग.स. सोसायटीमध्ये 40 ते 45 टक्के महिला सभासद असून सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील व संचालकांनी स्त्रीशक्तीवर विश्वास टाकला आहे.

 

संचालक मंडळाच्या त्या विश्वासाला सार्थक ठरवीत महिला सभासदांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांनीही पतपेढीच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ आणि सभासदांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि संस्थेचा सर्वांगीण विकास साधणे हेच प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment