होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पिंपरी चिंचवड घटना: मोशी दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

On: July 12, 2026 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Pimpari Chinchawad: मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ही शोध मोहीम सुरू असून दुर्घटनाग्रस्त इमारतीत आणखी सात जणांचा मृतदेह आढळून आले आहे. तसेच इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. बचाव पथक शोध घेत आहे.

दरम्यान मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली एकूण २३ जण अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतःहून बाहेर आले. यानंतर एनडीआरफ, भारतीय सेना, पीएमआरडीए अग्निशमन दल आदीच्या बचाव आतापर्यंत पथकाने ९ जणांना बाहेर काढले आहे.

शनिवारी बचाव पथकाने सात मृतदेह बाहेर काढले, त्यात रणजीत पाटील (२२), सन्नी माने (३९), अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६) आणि राहुल गायकवाड (३५) हे सात जण इमारतीत मृतावस्थेत आढळले. त्याना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. इमारतीभोवतीचा मलबा हटवण्यासाठी बारा पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली. त्यानंतर दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्स्कॅव्हेटर मशीन घटनास्थळी आणण्यात आल्या. बचाव कार्याला गती देण्यात आली.

एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग हटवून बचाव पथकाने आत प्रवेश केला. इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकासह संपूर्ण यंत्रणा मदत कार्यात जुंपली होती.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: बोधगया यात्रेला जाताय, मग ‘या’ दिवशी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे होणार प्रस्थान

प्रवाश्यांच्या खिशाला झळ: एसटीची १३ टक्के भाडेवाढ

राज्यातील SIR ला मुदतवाढ: मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; तारखा अशा ‘ते’जाणून घ्या

Car-Dumper Accident : लग्नानंतरच्या पहिल्याच प्रवासात सात जन्माची गाठ सुटली, कार-डंपरच्या अपघातात नवविवाहितेसह चौघे ठार

Rain Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात पुढील 4-5 दिवसात तुरळक स्वरुपाचा पाऊस; 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार

तीन वर्षात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र; रेल्वे पायाभूत विकासाबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment