होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; दोघांना अटक; रावेर पोलिस-एलसीबीची धडाकेबाज कारवाई

On: July 14, 2026 6:06 PM
Follow Us:
---Advertisement---

Raver News: अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना रावेर पोलिस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत दोघांना अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना १७ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (रा. ऐनपूर, ता. रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मोठा भाऊ शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३०) यांचा खून करण्यात आला.

घटना काय होती

मिळालेली माहिती अशी की, पोलिस तपासात आरोपी गणेश विजय उर्फ संजय घोरपडे (वय २५) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या कारणावरून दोघांमध्ये पूर्वी वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून गणेश घोरपडे व त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे यांनी कट रचला. त्यांनी मयताला दारू पाजून नांदुरखेडा शिवारातील शेतात नेले आणि गळा दाबून त्याचा खून करून घटनास्थळावरून फरार झाले, असा आरोप आहे.

आरोपींना तात्काळ अटक

घटनेनंतर रावेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींचा २४ तासांत शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment