होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी फेल! अमेरिका-इराणमधील तणाव वाढणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

On: July 8, 2026 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

US Iran Tension: इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले आहे. आता त्यांनी मोठी घोषणा करत इराणसोबतचा करार संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले आहे. अंकारामध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी “इराणसोबत आता आणखी कोणतेही करार होणार नाहीत. आमचे सर्व व्यवहार संपले आहेत”, असेही ते म्हणाले.

मंगळवारी म्हणजेच 7 जुलै रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये कतारी आणि सौदी जहाजांवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या अमेरिकेने बुधवारी म्हणजेच आज 8 जुलैच्या सकाळी इराणच्या अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. तर इराणनेही कुवेत आणि बहरीनवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. यामुळे अमेरिका अत्यंत नाराज आहे. कतारनेही अटींचे उल्लंघन केल्याबद्दल इराणला जबाबदार धरले आहे. कतारच्या म्हणण्यानुसार, इराणने ६० दिवसांसाठी कोणत्याही जहाजावर हल्ला न करण्याचे वचन दिले होते, परंतु त्याने स्वतःचेच वचन मोडले आहे.

यावर ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, इराणने त्यांच्याशी खोटे बोलले. त्यामुळे, तेहरानसोबत पुढील वाटाघाटी आता अशक्य आहेत. आम्ही तेहरानला अण्वस्त्रमुक्त करू. ही योजना लवकरच अंमलात आणली जाईल. इराणी कोणालाही सोडत नाहीत. त्यांनी मलाही लक्ष्य केले आहे. ते मलाही सोडायला तयार नाहीत. ते खूप घाणेरडे आहेत. मी त्यांना सांगितले आहे की, जर तुम्ही हल्ला केला, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. इराणी कोणाचेही ऐकत नाहीत. ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “नाटो सदस्य देश मला दहशतवाद्यांविरुद्ध लढायला मदत करत नाहीत. तर दुसरीकडे इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, आम्ही युद्धासाठी तयार आहोत. अमेरिकेने होर्मुझमध्ये आमचा विश्वासघात केला. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या वाटाघाटींवर विश्वास ठेवता येणार नाही.”

 

ट्रम्प यांच्या विरोधात घोषणा

तेहरानमध्ये खामेनी यांच्या अंत्यविधीच्या वेळी, इराणी मूलतत्त्ववाद्यांनी ट्रम्प यांच्या हत्येची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. ‘अमेरिकेचा नाश असो’ अशी घोषणाही देण्यात आली. इतकेच नव्हे तर, इराणच्या तज्ज्ञ परिषदेने ट्रम्प यांची हत्या करणे हे सर्व इराणी नागरिकांसाठी धार्मिक कर्तव्य असल्याचे घोषित करणारा फतवा जारी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

Leave a Comment