Hanoi Vietnam News: भारतासाठी एक दुःखद बातमी आली आहे, दक्षिण व्हिएतनाममधील एका बेटाच्या सफरीवरून परतणारी एक पर्यटक बोट शनिवारी उलटली, ज्यात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे. भारतीय दूतावासाने या संदर्भात एक निवेदन जारी केले असून, त्यात मदत आणि बचाव कार्याची माहिती देण्यात आली आहे. हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. व्हिएतनामचे सर्वात मोठे बेट असलेल्या फु क्वोकजवळच्या होन मे रुट न्गोआई बेटापासून सुमारे ४०० मीटर (१,३१० फूट) अंतरावर ही स्पीडबोट उलटली, तेव्हा त्यात ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी होते, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले, असे वृत्त असोसिएट प्रेसने दिले आहे.
परदेशात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर मोठे संकट कोसळले आहे. व्हिएतनाममधील लोकप्रिय पर्यटनस्थळ फू क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक टूरिस्ट बोट समुद्रात उलटल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या बोटीत एकूण ३२ भारतीय प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान, जोरदार वारे आणि समुद्रातील उंच खवळलेल्या लाटांमुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक प्रशासनाने प्राथमिक तपासात सांगितले आहे.
या दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच व्हिएतनामच्या तटरक्षक दलाने, नौदलाने आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात अडकलेल्या अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र, काही प्रवाशांचा अद्यापही शोध लागलेला नसल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असून समुद्रात बोटी, बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावास पूर्णपणे सतर्क झाला आहे. प्रभावित भारतीय नागरिकांची ओळख, त्यांची प्रकृती आणि सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्यासाठी भारतीय अधिकारी व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत. तसेच जखमींना आवश्यक ती मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित माहिती देता यावी यासाठी दूतावासाकडून विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
भारतीय दूतावासाने हेल्पलाइन सुरू केली
भारतीय नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथील भारतीय दूतावासाने 24 तास कार्यरत हेल्पलाइन सुरू केली आहे. भारतीय दूतावासाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहितीसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
पर्यटकांचा शोध सुरु
बेपत्ता भारतीय पर्यटकांचा शोध सुरू असून परिस्थितीवर भारतीय दूतावास आणि व्हिएतनाम प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे भारतातील संबंधित पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध आणि बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून सातत्याने माहिती अद्ययावत केली जात असून, या प्रकरणाकडे भारत सरकारही लक्ष ठेवून आहे.
‘ते’ खाजगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी
व्हिएतनामी टीव्हीवरील फुटेजमध्ये समुद्रात खवळलेले समुद्र आणि जोरदार वारे दिसत होते, तर बचाव पथके पाण्यात अडकलेल्या लोकांपर्यंत लाईफ बॉय फेकत होती. जेट स्कीच्या साहाय्याने वाचलेल्यांना किनाऱ्यावर परत आणण्यात आले, तर किनाऱ्यावरील लोकांनी पीडितांना प्रथमोपचार दिले.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हे पर्यटक एका खासगी मोबाईल फोन कंपनीचे कर्मचारी होते आणि ते वार्षिक सभेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, भारतीय दूतावासाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.









