होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

हवामान स्थिती: पाऊस बघतोय परीक्षा, धरणाची पाणी पातळी घटली; जळगावात कधी होणार पाऊस ‘ते’जाणून घ्या

On: July 19, 2026 7:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जळगावमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून १९ ते २२ दरम्यान असा तीन दिवस हलका आणि माध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आज दिवसभर वातावरणात उकाडा होता, जळगावचे कमाल तापमान आज ३२.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. उद्या ही हवामान जवळपास असेच राहणार आहे. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहे. मात्र पाऊस बरसण्याचे नाव घेईना, बळीराजाची परीक्षा बघत आहे. इकडे पिण्याच्या पाण्याचा साठा देखील कमी झाला आहे, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. ऊर्ध्व तापी हतनूर धरणात ५१.६९ टक्के पाणीसाठा आहे. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ५९.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस पडला नाही. तर, धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी कपातीची टांगती तलवार लटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात जळगावकरांना पाणी सांभाळून वापरावे लागणार आहे. हवामान खात्याने २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे

उत्तर महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट

जळगाव सारखीच परिस्थिती धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर आदी भागात आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यामुळे मेगगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पावसाची शक्यता वर्तविली आहे. एकंदरीत वातावरणात उकाडा जाणवत असल्याने पावसाची सांशकता कायम असली तरी जळगावला २३ जुलैला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

राज्यात हवामान असे असेल

दि.१९ ते २३ जुलै दरम्यान हवामान विभागाने कोकण व मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला आहे. या काळात मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. उद्या सोमवारी कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई हवामान विभागाचा इशारा (२० ते २३ जुलै)

२० जुलैला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.

२१ जुलैला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५-५५ किमी/तास वेगाने (आणि ६५ किमी/तास वेगाचे झोत असलेले) वारे वाहण्याची शक्यता आहे.

२२ जुलैला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५-५५ किमी/तास वेगाने (आणि ६५ किमी/तास वेगाचे झोत असलेले) वारे वाहण्याची शक्यता आहे.

२३ जुलैला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५-५५ किमी/तास वेगाने (आणि ६५ किमी/तास वेगाचे झोत असलेले) वारे वाहण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment